Satara Mahamandal Manch is caught in the trap of bribery | सातारा महामंडळ व्यवस्थापिका लाचलुचपतच्या जाळ्यात

ठळक मुद्देसलग दुसºया दिवशी कारवाई शैक्षणिक कर्जाचा हप्ता मंजुरीसाठी १५ हजार स्वीकारले

सातारा : मंजूर झालेल्या शैक्षणिक कर्जाचा तिसरा हप्ता देण्यासाठी १५ हजार ८०० रुपयांची लाच घेताना येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक तबस्सुम शमशुद्दीन मुल्ला (वय ३१, रा. अजिंक्य विहार, निशिगंधा कॉलनी, कोडोली सातारा) हिला लाचलुचपतच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले.

येथील रविवार पेठेमध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय आहे. संबंधित तक्रारदार यांच्या मुलीला शैक्षणिक कर्ज मंजूर झाले होते. या कर्जाचा तिसरा हप्ता मुलीच्या नावावर जमा करण्यासाठी तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, तरीही हप्ता जमा केला नाही. तक्रारदाराकडे १५ हजार ८०० रुपयांच्या लाचेची मागणी तबस्सुमने केली.

त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाचलुचतपच्या अधिकाºयांकडे दि. ५ रोजी रितसर तक्रार नोंदविली. त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकाºयांनी शहानिशा केली असता लाचेची मागणी होत असल्याचे पुढे आले. त्यानंतर अधिकाºयांनी गुरुवारी दुपारी रविवार पेठेतील कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी तबस्सुमला १५ हजार ८०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सातारा शहर पोलिस ठाण्यात तबस्सुम विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

औद्योगिक महामंडळाच्या लिपिकाला रंगेहाथ पकडल्यानंतर सलग दुसºया दिवशी एसीबीने ही कारवाई केल्याने साताºयात खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला, हवालदार संभाजी बनसोडे, आनंदराव सपकाळ, भरत शिंदे, विजय काटवटे,तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसूळ, अजित कर्णे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, विनोद राजे,विशाल खरात, नीलिमा जमदाडे, मधुमती कुंभार, श्रद्धा माने यांनी भाग घेतला.

महिलांचे प्रमाण अत्यल्प...
खंडाळ्याच्या तत्कालीन तहसीलदार सुप्रिया बागवडेला काही वर्षांपूर्वी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर बरीच वर्षे एकही महिला एसीबीच्या जाळ्यात सापडली नव्हती. तबस्सुम मुल्ला ही कारवाई झालेली बहुदा दुसरी महिला आहे. पुरुषांच्या तुलनेत लाच घेण्याचे प्रमाण महिलांचे अत्यल्प असल्याचे एसीबीच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.