सातारा : गतवर्षीपेक्षा २० टीएमसी साठा कमी, सिंचनासाठी मागणी लवकर वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 05:02 PM2018-12-15T17:02:19+5:302018-12-15T17:04:32+5:30

यंदा धरणात गतवर्षीपेक्षा सुमारे २० टीएमसी पाणीसाठा कमी आहे. तर सध्या जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांमध्ये ११५.८ टीएमसी इतका पाणीसाठा राहिला आहे.

Satara: Less than 20 TMC stocks last year, demand for irrigation has increased fast | सातारा : गतवर्षीपेक्षा २० टीएमसी साठा कमी, सिंचनासाठी मागणी लवकर वाढली

सातारा : गतवर्षीपेक्षा २० टीएमसी साठा कमी, सिंचनासाठी मागणी लवकर वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देगतवर्षीपेक्षा २० टीएमसी साठा कमी, सिंचनासाठी मागणी लवकर वाढलीजिल्ह्यातील मोठ्या धरणात ११६ टीएमसी पाणी; आवर्तन सुरूच

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी धुवाँधार पाऊस बरसल्याने वेळेत धरणे भरली. तर दुसरीकडे सातारा, सांगली जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे नियोजनानुसार धरणातून सिंचनासाठी लवकर पाणी सोडण्यात आले. परिणामी यंदा धरणात गतवर्षीपेक्षा सुमारे २० टीएमसी पाणीसाठा कमी आहे. तर सध्या जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांमध्ये ११५.८ टीएमसी इतका पाणीसाठा राहिला आहे.

जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या प्रारंभी पावसाने सुरुवात केली. पूर्वेसह पश्चिम भागात चांगला पाऊस झाला, यामुळे पेरणी वेळेत झाली. मात्र, पश्चिम सोडून पूर्व भागात अपवाद वगळता नंतर पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडले. तर पश्चिम भागात जुलै आणि आॅगस्ट महिन्यात धुवाँधार पाऊस झाला. त्यामुळे कोयनेसह, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आदी धरणे वेळेत भरली.

त्यातच सतत पाऊस असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यांत परतीचा पाऊस बरसलाच नाही, त्यामुळे धरणातही पाणीसाठा वाढला नाही.

तसेच पूर्व भागातील अनेक तालुक्यांत पावसाने वार्षिक सरासरीही गाठली नाही. काही तालुक्यांत तर ५० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला, त्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. त्यानुसार नियोजनाप्रमाणे सातारा आणि

सध्या अनेक धरणांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने १४ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ११५.५ टीएमसी इतका साठा राहिला आहे. तर गतवर्षी तो १३५.३९ टीएमसी इतका होता. दुष्काळी भागातील तलाव, ओढे कोरडे आहेत, त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी सतत होत आहे. परिणामी आणखी पाणी सोडावे लागणार आहे. यावर्षी तारळी धरणात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

धरणे          यावर्षी        गतवर्षी           एकूण क्षमता
धोम                 ९.४१     ११.२२                १३.५०
कण्हेर               ८.३०        ९.०४               १०.१०
कोयना               ८३.८९      ९६.२३          १०५.२५
बलकवडी           २.९८         ४.०५                ४.०८
उरमोडी                ६.५४       ९.५१                 ९.९६
तारळी                  ४.६८       ४.५३                ५.८५

Web Title: Satara: Less than 20 TMC stocks last year, demand for irrigation has increased fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.