सातारा : सोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 01:29 PM2018-11-09T13:29:07+5:302018-11-09T13:34:36+5:30

सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा या हेतूने कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.

Satara: Initiation of Soyabean Shopping Center, Koregaon Market Committee Initiative | सातारा : सोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार

सातारा : सोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देसोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकारआॅनलाईन नोंदणी करण्याचीही शेतकऱ्यांसाठी संधी उपलब्ध

पिंपोडे बुद्रूक (सातारा) : सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा या हेतूने कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारीत केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी या हेतूने कोरेगांव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने नाफेडच्या मंजुरीने खरीप हंगाम सन २०१८-१९ करीता बाजार समिती कोरेगांव येथील मुख्य बाजार आवारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहे.

हे केंद्र १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव भोईटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वखार महामंडळ कोरेगाव साठा अधीक्षक जाधव, सहायक निबंधक सुद्रीक, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले, कोरेगाव बाजार समितीचे सहायक सचिव संभाजीराव निकम, संचालक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

बाजारात सोयाबीन मालाची ज्यादा आवक झाल्याने बाजार भाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अशा प्रकारे शेतकऱ्यांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये या हेतूने हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान अधारभूत किंमतीने म्हणजेच प्रति क्विंटल ३ हजार ३९९ रुपये दराने सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र्रावर आॅनलाईन नोंदणी करता २०१८-२०१९ चे सोयाबीन या पिक पाण्याच्या नोंदीसह ७/१२ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेला माल स्वच्छ असावा मालाची आर्दता कमाल बारा टक्के असावी तो काडीकचरा किंवा मातीमिश्रिती नसावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे

Web Title: Satara: Initiation of Soyabean Shopping Center, Koregaon Market Committee Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.