सातारा : वर्धनगड संवर्धनासाठी एकवटले शेकडो, लाठीकाठी, दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:18 PM2018-06-06T15:18:48+5:302018-06-06T15:18:48+5:30

स्वराज्याचे प्रवेशद्वार असणारे किल्ले वर्धनगडाचे संवर्धन करण्याच्या चंग मनाशी बांधून शकडो शिवभक्त किल्ले वर्धनगडवर एकवटले. गडावर श्रमदान करून मातीच्या ढिगाखाली गाडले गेलेल्या दोन पाण्याच्या टाक्या मोकळ्या केल्या. शिवभक्तांच्या अथक प्रयत्नामुळे या टाक्यांनी मोकळा श्वास घेतल्याने दुर्ग संवर्धक शिवभक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले.

Satara: Hundreds of hundreds gathered for the conservation of Vardangag, Lathi Katha, Bandmatta demonstration | सातारा : वर्धनगड संवर्धनासाठी एकवटले शेकडो, लाठीकाठी, दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिक

सातारा : वर्धनगड संवर्धनासाठी एकवटले शेकडो, लाठीकाठी, दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिक

Next
ठळक मुद्देवर्धनगड संवर्धनासाठी एकवटले शेकडो, लाठीकाठी, दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिक  पाण्याच्या दोन टाक्यांनी घेतला मोकळा श्वास

पुसेगाव : स्वराज्याचे प्रवेशद्वार असणारे किल्ले वर्धनगडाचे संवर्धन करण्याच्या चंग मनाशी बांधून शकडो शिवभक्त किल्ले वर्धनगडवर एकवटले. गडावर श्रमदान करून मातीच्या ढिगाखाली गाडले गेलेल्या दोन पाण्याच्या टाक्या मोकळ्या केल्या. शिवभक्तांच्या अथक प्रयत्नामुळे या टाक्यांनी मोकळा श्वास घेतल्याने दुर्ग संवर्धक शिवभक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले.

वर्धनगड येथे रविवारचा दिवस गाठून शिवभक्तांच्या सहकार्याने राजा शिवछत्रपती ग्रुप, दुर्गवीर प्रतिष्ठान, राजधानी रायगड ग्रुप, राजा शिवशंभू प्रतिष्ठान, शिवदुर्ग टेकर्स श्रीगोंदा यांच्या सहकार्यातून वर्धनगड संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले.

शिवभक्तांच्या उपस्थितीमुळे वर्धनगड शिवमय झाला होता. यावेळी शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी, राजा शिवछत्रपतीचे मयूर भोसले, शिवशंभू प्रतिष्ठानचे अक्षय अनपट, अक्षय गायकवाड, दुर्गवीरचे इंगळे, राजधानी रायगडचे संजय जगदळे, छावा ग्रुपचे संजय घोरपडे, धर्म रक्षकचे विशाल शिंदे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

Web Title: Satara: Hundreds of hundreds gathered for the conservation of Vardangag, Lathi Katha, Bandmatta demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.