सातारा, जावळीत जुगार, दारू अड्ड्यांवर छापे, सातजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 03:39 PM2018-12-21T15:39:13+5:302018-12-21T15:52:32+5:30

सातारा शहरात आणि जावळी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार आणि दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे १५ हजारांचा ऐवज जप्त केला.

Satara, gambling gambling, raids on liquor and arresting seven people | सातारा, जावळीत जुगार, दारू अड्ड्यांवर छापे, सातजणांना अटक

सातारा, जावळीत जुगार, दारू अड्ड्यांवर छापे, सातजणांना अटक

Next
ठळक मुद्देसातारा, जावळीत जुगार, दारू अड्ड्यांवर छापेसातजणांना अटक : १५ हजारांचा ऐवज जप्त

सातारा : शहरात आणि जावळी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार आणि दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे १५ हजारांचा ऐवज जप्त केला.

सातारा बसस्थानकासमोर असणाऱ्या शौचालयाच्या आडोशाला मटका घेताना शाहूपुरी पोलिसांनी रवींद्र रामचंद्र दीक्षित (वय ४१, रा. कोटेश्वर मंदिराच्या पाठीमागे, गडकरआळी सातारा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६७५ रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

हा मटका तो मालक जब्बार जमाल पठाण (रा. मेढा, ता. जावळी) याच्यासाठी घेत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी पठाणच्या विरोधातही गुन्हा दाखल केला.

जावळी तालुक्यातील सोमर्डी गावच्या हद्दीतील एका वीटभट्टीच्या पाठीमागे सुरू असणाऱ्या दारूच्या अड्ड्यावर मेढा पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अभिजित निरंजन परामणे (वय ३०, रा. सोमर्डी, ता. जावळी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या ६५ बाटल्या आणि रोख रक्कम असा सुमारे ६ हजार ९६३ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

तिसरी कारवाईसुद्धा जावळी तालुक्यातीलच खर्शीबारामुरे गावच्या हद्दीत करण्यात आली. यावेळी पोलिसांनी रमेश प्रकाश गोळे, दत्तात्रय ढमाळ, दिगंबर रघुनाथ कांबळे, निखिल नंदकुमार झणझणे (रा. सर्व रा. खर्शीबारामुरे, ता. जावळी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी-विदेशी दारूच्या २७ बाटल्या आणि रोख रक्कम असा सुमारे २ हजार ७६२ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

तिसरी कारवाई करहर, ता. जावळी येथील गावच्या हद्दीत प्रकाश धोंडिबा गोळे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. या ठिकाणी राहुल सदाशिव गावडे (वय ३६), संदीप आनंदा तुपे (वय ३०, दोघेही रा. खर्शीबारामुरे, ता. जावळी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांकडून १० हजार ८०० रुपयांचे जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

Web Title: Satara, gambling gambling, raids on liquor and arresting seven people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.