सातारा फूटपाथवर टपरी; रस्त्यावर पादचारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:20 PM2018-03-16T23:20:04+5:302018-03-16T23:20:04+5:30

सातारा : शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे.

Satara footpath; Street pedestrians ... | सातारा फूटपाथवर टपरी; रस्त्यावर पादचारी...

सातारा फूटपाथवर टपरी; रस्त्यावर पादचारी...

Next
ठळक मुद्देपालिका, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सातारा : शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे. फूटपाथवरच टपऱ्या मांडल्याने गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आवासून उभा राहिला आहे.
पालिका व बांधकाम विभागातील कर्मचाºयांच्या सोयीच्या कारभारामुळे टपरीबहाद्दरांना रान मोकळे पडले आहे. या रस्त्याचे मोठ्या थाटात चौपदरीकरण करण्यातआले.

बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला असणारे अतिक्रमण हटविण्यात आले. एवढेच काय बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर असणारे महाकाय वडाचे झाडही तोडून टाकण्यात आले. या रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ तयार करण्यात आले. मात्र, या फूटपाथवर पुन्हा अतिक्रमणे बोकाळू लागली आहेत.

जिल्हा परिषद सभापती निवासाच्या बाहेरच्या फूटपाथवरच आता खोकी थाटलेली पाहायला मिळत आहेत. या रस्त्यावर वाहनांचा वेग मोठा असतो. पादचाºयांना फूटपाथवरून चालण्याशिवाय पर्याय नाही. आता या खोक्यांमुळे पादचाºयांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालय याचा परिसरात असल्याने येथे मोठी गर्दीही असते.

पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मात्र पालिका किंवा बांधकाम विभागाची यंत्रणा मात्र कारवाई का करत नाही, यात नेमके काय काळे बेरे आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फूटपाथवर मांडलेली खोकी कुणाच्या आशीर्वादाने आली? तसेच याला पालिका व बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाºयांची फूस आहे का? यातून निर्माण होणारा काळाबाजार जनतेसमोर येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच कारवाई करण्याची अपेक्षा सातारकर व्यक्त करत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथवरील टपºया हटवाव्यात.

फुटकळ चिरीमिरीवाले उघडे पाडा
फूटपाथवर अतिक्रमण करायला लावणारे फुटकळ चिरीमिरीवाले पालिका प्रशासनात कार्यरत झाले आहेत. अतिक्रमण विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे समोर येत आहे. पालिका हद्दीतल्या या अतिक्रमणांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशेने बोटे दाखविले जात आहेत. नगराध्यक्षांनीच आता झारीतले शुक्राचार्य बाहेर काढावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Satara footpath; Street pedestrians ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.