सातारा : लग्नातील बक्षिसीवरून वाढप्याचा खून, एकाच कुटुंबातील पाचजण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:13 PM2018-04-25T13:13:54+5:302018-04-25T13:13:54+5:30

लग्नकार्यात बक्षीस स्वरूपात मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून वाढप्याचा कुऱ्हाड व कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना जावळी तालुक्यातील सोनगाव येथे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. राहूल मेंगळे (वय ३५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

Satara: Five people from the same family were arrested on the death of a prize winner | सातारा : लग्नातील बक्षिसीवरून वाढप्याचा खून, एकाच कुटुंबातील पाचजण अटकेत

सातारा : लग्नातील बक्षिसीवरून वाढप्याचा खून, एकाच कुटुंबातील पाचजण अटकेत

ठळक मुद्देलग्नातील बक्षिसीवरून वाढप्याचा खून, एकाच कुटुंबातील पाचजण अटकेतजावळी तालुक्यातील सोनगाव येथील घटना

सायगाव : लग्नकार्यात बक्षीस स्वरूपात मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून वाढप्याचा कुऱ्हाड व कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना जावळी तालुक्यातील सोनगाव येथे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
राहूल मेंगळे (वय ३५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. मोहन सुखदेव मेंगळे, अनिल मोहन मेंगळे, विशाल मोहन मेंगळे, सनी मोहन मेंगळे व नंदा मोहन मेंगळ (रा. सोनगाव, ता. जावळी) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत मेढा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी पार पडलेल्या एका लग्नसोहळ्यात सर्व आरोपी व मयत व्यक्तीचा भाऊ विश्वनाथ मेंगळे हे वाढपी म्हणून गेले होते. यावेळी त्यांना एक हजार रुपये बक्षीस स्वरूपात
देण्यात आले होते. हे पैसे कोणालाच द्यायचे नाही यावरून मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास विश्वनाथ मेंगळे व त्याचा भाऊ राहूल मेंगळे यांना या सर्वांनी धक्काबुक्की करत मारहाण केली.

हा वाद विकोपाला गेल्याने सनी मेंगळे याने विश्वनाथ मेंगळे यांच्या डोक्यात खोरे मारून त्यांना जखमी केले. यानंतर अनिल मेंगळे याने राहूल मेंगळे याच्यावर कुऱ्हाड व कोेयत्याने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी रात्रभर शोध घेऊन पाचही आरोपींना अटक केली. यापैकी तीघे शिवारात तर दोघे घरातील माळ्यावर लपून बसले होते. विश्वनाथ मेंगळे यांनी
पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने तपास करीत आहेत.

 

Web Title: Satara: Five people from the same family were arrested on the death of a prize winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.