सातारा : खटाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका, शेतकरी पिकं काढण्यात मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, February 09, 2018 4:06pm

खटाव तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील हरभरा काढणीस तसेच मळणीच्या कामात शेतकरी व्यस्त दिसून येत आहेत. त्यातच दोन दिवसापासून बदललेल्या हवामानाचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. जी पीके काढणीस योग्य झाली आहेत ती सुरक्षीत घरी आणण्यासाठी ची लगबग शिवारात दिसून येत आहे.

खटाव (सातारा) : खटाव तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील हरभरा काढणीस तसेच मळणीच्या कामात शेतकरी व्यस्त दिसून येत आहेत. त्यातच दोन दिवसापासून बदललेल्या हवामानाचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. जी पीके काढणीस योग्य झाली आहेत ती सुरक्षीत घरी आणण्यासाठीची लगबग शिवारात दिसून येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांपासून हवेत अचानक झालेला बदल, पावसाळी वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर हातातोडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे वाया जातील या भीतीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. काही ठिकाणी हरभरा पीक काढून ठेवले आहे. ते या वातावरणात सापडू नये यासाठी मळुन आणण्याची गडबड चालली आहे. परिसरात दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण दिसू लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. या आभाळामुळे ज्वारी, कांदा, हरभरा पीकांवर किडींचा प्रादूर्भाव होऊन उत्पन्नात घट होणारच आहे. त्याहीपेक्षा पिकांचेही नुकसान होणार आहे. शेतमालाला भाव नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला या हवामानाचा फटका येणाऱ्या पीकाला बसण्याची भिती शेतकऱ्यातुन व्यक्त केली जात आहे. सध्याचे वातावरण पाहता रब्बी पीके धोक्यात.

संबंधित

विद्यार्थ्यांच्या बाजारपेठेत ५० हजारांची उलाढाल : शेरेचीवाडीतील शाळा
खेड तालुक्यात शेतकऱ्याची विषप्राशन करुन आत्महत्या
Droght In Marathwada : पावसाने दिली हूल; भीषण दुष्काळाची चाहूल 
Droght In Marathwada : पावसाअभावी पिके गेली, गाव सोडायची वेळ आली !
उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने आले अन् वातावरण तणावपूर्ण झाले!

सातारा कडून आणखी

साताऱ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; भरदुपारी आले अंधारून
औंध : मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आज अष्टमी उत्सव : औंधमध्ये भक्तिमय वातावरण
‘त्यांनी’ पीडित महिलांना दिला हक्काचा निवारा
डोक्यात पार घालून पत्नीचा खून, पती पसार : चारित्र्याचा संशय, निमित्त पैशांवरून भांडणाचे
साताऱ्यातील ३३ घरांत डेंग्यूच्या अळ्या : १४५ घरांची तपासणी; रात्री औषध फवारणी

आणखी वाचा