सातारा : माणगंगेतून शेकडो ट्रकमधून वाळूची लूट, चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 02:01 PM2018-06-18T14:01:39+5:302018-06-18T14:01:39+5:30

म्हसवड येथील माणगंगा नदीपात्रात मातीमिश्रीत वाळूचे निष्कासन करण्यासाठी दोन ठिकाणी वाळू उचलण्याचे दोन परवाने दिले आहेत. मात्र ज्या ठिकाणचे परवानगी असताना इतर ठिकाणची सुमारे चाळीस चाळीस फूट खड्डे काढून दिवस रात्र शेकडो ट्रकमधून हजारो ब्रास वाळू उचलून मोठ्या प्रमाणात महसूलच्या नियमांना चुना लावून नियमांचे उल्लंघन करून हजारो ब्रास वाळूची लुट सुरु आहे.

Satara: Demand for sand robbery, inquiry inquiry from hundreds of trucks in Mangaon | सातारा : माणगंगेतून शेकडो ट्रकमधून वाळूची लूट, चौकशीची मागणी

सातारा : माणगंगेतून शेकडो ट्रकमधून वाळूची लूट, चौकशीची मागणी

Next
ठळक मुद्दे माणगंगेतून शेकडो ट्रकमधून वाळूची लूटचौकशीची मागणी : २५ वाहनांवर कारवाईचे नाटक

म्हसवड : म्हसवड येथील माणगंगा नदीपात्रात मातीमिश्रीत वाळूचे निष्कासन करण्यासाठी दोन ठिकाणी वाळू उचलण्याचे दोन परवाने दिले आहेत. मात्र ज्या ठिकाणचे परवानगी असताना इतर ठिकाणची सुमारे चाळीस चाळीस फूट खड्डे काढून दिवस रात्र शेकडो ट्रकमधून हजारो ब्रास वाळू उचलून मोठ्या प्रमाणात महसूलच्या नियमांना चुना लावून नियमांचे उल्लंघन करून हजारो ब्रास वाळूची लुट सुरु आहे.

त्याबाबत ग्रामस्थांनी अनेक लेखी तक्रारी करून माहितीच्या अधिकारात माहिती मिळण्यासाठी मागणीही केली होती. या अनुषंगाने चार दिवसांपूर्वी महसूल विभागाने सुमारे २५ वाहनांवर कारवाईचे नाटक केले होते. मात्र वाहनातील वाळू पोलीस ठाण्याच्या आवारात खाली करून वाहने सोडून देण्यात आली त्यामुळे यामध्ये सबसे बडा खिलाडी कोण? जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील ठेकेदाराच्या दबावाने ही कारवाई थांबवली का?, असे प्रश्न जनता विचारत आहे.

सध्या माणगंगा नदीपात्रात बनगर यांच्या गट नं. ५७७/१४ मधील ३८ गुंठे क्षेत्रातील १५२४ ब्रास वाळू तर गणपती कलढोणे यांच्या ५७४/२ मधील १३ गुंठ्यातील २३0५ ब्रास मातीमिश्रीत वाळूचे निष्कासन करण्यासाठी दोन ठिकाणी परवाने दिले आहेत.

मात्र याठिकाणी नियमांचे उल्लंघन करून करून मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास वाळूची लूट होत आहे. यामधील बनगर यांचा परवाना लांबी ३८0 रुंदी ५९ उंची ३.८0 फूट आहे. तर कलढोणे यांचा लांबी २३७ रुंदी १४६ उंची ६.६६ फूट एवढ्या आकाराचा परवाना आहे.

कलढोणे यांच्या ठेक्यात बदल करू संबंधित ठेकेदाराने कलढोणे यांच्या घरात भांडणे लावण्याचे काम केले आहे. या दोन्ही ठिकाणी २५ ते ३0 फूट खोल खड्डे काढून हजारो ब्रास वाळू उपसा केली जात आहे. याबाबत अनेकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्याचे समजते.

ज्या ठिकाणी प्लॉटचे लिलाव करून परवाने दिले आहेत. ते प्लॉट सोडून इतर ठिकाणी उपसा केला जात आहे. परवाने दिलेल्या दोन्ही ठिकाणी १0 वाहनाचा परवाना असताना वाळू ठेकेदार १00 वाहनाच्या सहायाने हजारो ब्रास वाळूचा ऊपसा करत आहेत.

Web Title: Satara: Demand for sand robbery, inquiry inquiry from hundreds of trucks in Mangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.