सातारा : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात वासरू ठार, परिसरात भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 03:19 PM2018-02-21T15:19:30+5:302018-02-21T15:21:13+5:30

फलटण शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, भर वस्तीत स्वामी विवेकानंदनगर भागात गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.

Satara: A calf killer killed by mob dogs, fears in the area | सातारा : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात वासरू ठार, परिसरात भीती

सातारा : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात वासरू ठार, परिसरात भीती

googlenewsNext
ठळक मुद्देमोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात वासरू ठार फलटण शहर परिसरात भीती

फलटण : शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, भर वस्तीत स्वामी विवेकानंदनगर भागात गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.

फलटण शहरात मोकाट कुत्री, डुकरे व जनावरांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ठिकठिकाणी ही कुत्री डुकरांची पिल्ले, गायीची वासरं व लहान बकरी यांच्यावर हल्ला करताना दिसतात. दुचाकीस्वारांच्या गाडीमागे लागणे, रात्रीचे चालत जाणाऱ्या व्यक्तींवरही हल्ला करतात.

मोकाट जनावरांमधील काही गायी मारक्या असून, मंडई परिसरात या जनावरांचा लहान मुले, स्त्रिया व वृद्धांना त्रास होतो, तर काही जखमी होतात. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीचीही कोंडी होते. अशी मोकाट कुत्री व जनावरांवर नगरपालिकेने पायबंद घालावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Web Title: Satara: A calf killer killed by mob dogs, fears in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.