राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:27 AM2017-12-07T11:27:53+5:302017-12-07T11:33:54+5:30

जायंटस ग्रुप आॅफ सातारा हार्मनी व एन. डी. जोशी स्मरणार्थ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चतुरंग २०१७ राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता ठरला.

Sangli's international master Sameer Kadamale winner in state level chess tournament | राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता

सातारा जिल्ह्यांत चतुरंग २०१७ राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता ठरला.

Next
ठळक मुद्देखुल्या गटात ओंकार कडव प्रथम, रेटिंग गटात इशा कोळी, तृप्ती प्रभू, मिहीर जोशी, शिरीष गोगटे, उत्कर्ष लोमटे विजेते चतुरंग २०१७ राज्य जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत १३ जिल्ह्यांतून १९७ खेळाडू सहभागी

सातारा : जायंटस ग्रुप आॅफ सातारा हार्मनी व एन. डी. जोशी स्मरणार्थ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चतुरंग २०१७ राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता ठरला.


या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर या जिल्ह्यांतून १९७ खेळाडू सहभागी झाले होते.


या स्पर्धेत ७ वर्षांखालील गटात विराज अग्निहोत्री, ९ वर्षांखालील गटात अनुज दांडेकर, ११ वर्षांखालील गटात निशीत बलदवा, १३ वर्षांखालील गटात मिहिर सरवदे, १५ वर्षांखालील गटात सत्यजित गायकवाड, १९ वर्षांखालील गटात रिया लाहोटी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

विविध रेटिंग गटात इशा कोळी, तृप्ती प्रभू, मिहीर जोशी, शिरीष गोगटे व उत्कर्ष लोमटे हे विजेते ठरले. गुरुकुल स्कूलला मोस्ट पार्टिसिपेटिंग स्कूल व पोदार स्कूलला बेस्ट स्कूलचे पारितोषिक मिळाले.

खुल्या गटात ओंकार कडव यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कैलास भट, पल्लवी भट, आरती शेवडे आदींनी परिश्रम घेतले, अशी माहिती संयोजन समिती प्रमुख सीए मकरंद जोशी यांनी दिली.
अ३३ंूँेील्ल३२

Web Title: Sangli's international master Sameer Kadamale winner in state level chess tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.