विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा ! : भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 08:59 PM2018-08-14T20:59:28+5:302018-08-14T21:00:07+5:30

‘कºहाड विमानतळ विस्तारवाढ कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. तरीही प्रशासन पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया डावलून विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आंदोलनाची ताकद दाखवून द्यावी

Remember to try to boost the extension! : India Patankar | विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा ! : भारत पाटणकर

विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा ! : भारत पाटणकर

googlenewsNext
ठळक मुद्दे दहा दिवसांत प्रशासनाविरोधात इशारा मोर्चा

कºहाड : ‘कºहाड विमानतळ विस्तारवाढ कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. तरीही प्रशासन पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया डावलून विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आंदोलनाची ताकद दाखवून द्यावी लागेल. जबरदस्तीने गेलात तर खबरदार,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे व कºहाड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी प्रशासनाला दिला.

विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीचा मेळावा मंगळवारी वारुंजी, ता. कºहाड पार पडला. मेळाव्याप्रारंभी डॉ. पाटणकर यांनी विमानतळ विस्तारवाढी संदर्भात माध्यम प्रतिनिधींशी येथील शासकीय विश्रामगृहात संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी आपली भूमिका मांडली.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘वारुंजी, केसे व मुंढे या तीन गावांतील शेती, घरे तसेच भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेवरील शेकडो हेक्टर पिकाऊ जमीन विमानतळ विस्तारवाढीमध्ये बाधित होणार आहे. ५० हेक्टर ५२ आर क्षेत्र बाधित होणार असून, सुमारे ५९३ इतके खातेदार शेतकरी आहेत. याशिवाय इतर अधिकारात २०७ शेतकरी आहेत.

आम्ही विमानतळासाठी कोरेगाव तालुक्यातील निढळ व कºहाड तालुक्यातील शामगाव येथील जागा पर्याय दिली होती. पुनर्वसन कायद्यानुसार पर्यायी तपासणी होणे आवश्यक असते; पण प्रशासनाने तसे काही केले नाही. कºहाड विमानतळ विस्तारवाढीबाबतचा पर्याय प्रशासनानेच अंतिम केला आहे. जमीन संपादनाची मोेजणी अद्याप झालेले नाही. ही मोजणी झाल्याशिवाय पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही.

दहा दिवसांत काढणार इशारा मोर्चा : पाटणकर
२०१५ ते २०१८ च्या दरम्यान कोणतीच प्रक्रिया चालू नसताना अचानक प्रांताधिकारी बैठक घेतात, हा काय प्रकार आहे? ही हुकूमशाही नव्हे. जर तुम्ही जबरदस्तीने ही विस्तारवाढ करणार असाल तर याद राखा. या प्रश्नावर यापूर्वी अनेक आंदोलन, मोर्चे झाले आहेत. हे आंदोलन भविष्यात अधिक तीव्र करण्यात येईल. याचाच पहिला टप्पा म्हणून येत्या दहा दिवसांत प्रशासनाविरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

Web Title: Remember to try to boost the extension! : India Patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.