रामराजे कॉलर उडवित नाहीत... प्रश्न सोडवितातर-घुनाथराजे नाईक-निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:26 PM2018-06-27T22:26:42+5:302018-06-27T22:28:14+5:30

‘रामराजे कॉलर उडवत नाहीत तर जनतेचे प्रश्न सोडवितात. रामराजेंबद्दल कोण काय म्हणतंय, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही.

Ramaraje do not fly the caller ... if you can solve the question- Ghunatharaje Naik-Nimbalkar | रामराजे कॉलर उडवित नाहीत... प्रश्न सोडवितातर-घुनाथराजे नाईक-निंबाळकर

रामराजे कॉलर उडवित नाहीत... प्रश्न सोडवितातर-घुनाथराजे नाईक-निंबाळकर

Next
ठळक मुद्देउदयनराजेंचे नाव न घेता टीका, फलटणला शेतकरी व्यथा निवारण कक्षाचे उद्घाटन

फलटण : ‘रामराजे कॉलर उडवत नाहीत तर जनतेचे प्रश्न सोडवितात. रामराजेंबद्दल कोण काय म्हणतंय, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही. रामराजे कॉलर उडवत नसले तरी मातृभूमीची पाण्याची तहान त्यांनी भागविली आहे. आमच्या आजोबांनी जे संस्कार दिलेत व नेहमी दुसऱ्याचे दु:ख ओळखायला शिकण्याचे तत्त्व दिले आहे, त्याचे पालन रामराजेंनी केले आहे.’ असा टोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे यांना नाव न घेता लगावला.

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रामराजे शेतकरी व्यथा निवारण कक्ष, योजना, आरोग्य विषयक कार्यक्रम आदी योजनांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती भगवानराव होळकर, सचिव शंकरराव सोनवलकर, पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, नगराध्यक्षा नीता नेवसे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कल्पकतेने शेतकरी केंद्रबिंदू मानून सुरू असून, जिल्ह्यात आघाडीवर असलेली ही बाजार समिती येत्या दोन वर्षांत महाराष्ट्रातही आघाडीवर असेल. शेतकºयांच्या हिताचा विचार करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बाजार समितीचे चेअरमन व संचालक दिवसरात्र प्रयत्नशील असून, नावीन्यपूर्ण योजना बाजार समितीने राबवित शेतकºयांचा विश्वास संपादन केला आहे. शेतकरी व त्यांच्या मुलांसाठी अनेक योजना सुरू असतानाच त्यांचे आरोग्य, विजेच्या तक्रारी, महसूल विभागाकडील कामे, पोलीस आदी विभागातील प्रलंबित कामे सोडविण्यासाठी बाजार समिती आवर्जून लक्ष देत असल्याने ही बाजार समिती महाराष्ट्रात दोन वर्षांत आघाडीवर असेल.’

या हंगामात ऊस जास्त असला तरी श्रीराम आणि शरयू कारखाना जास्तीत जास्त गाळप करून वेळेवर पेमेंट देईल. मात्र, स्वराज कारखान्याबद्दल आपण सांगू शकत नाही. त्यांचं काय चाललंय, हेच कळत नसल्याची टीका रामराजेंनी केली.
रघुनाथराजे म्हणाले, ‘रामराजेंच्या माध्यमातूनच आम्ही बाजार समितीचा कारभार पारदर्शक आणि शेतकरी हिताचा करीत आहे. बाजार समितीमार्फत लवकरच १२५ बेडचे हॉस्पिटल, शेतकºयांच्या मुलांना रोजगार, ८ नवीन पेट्रोल पंप, रुग्णवाहिका सेवा हे उपक्रम तातडीने शेतकºयांसाठी सुरू करणार आहोत. बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ३ कोटी रुपयांच्या आसपास जाणार आहे.

साखरवाडी कारखाना अडचणीतून बाहेर काढू
तालुक्यात उसाचे पीक वाढल्याने येत्या हंगामात संपूर्ण गाळपाची समस्या निर्माण होणार आहे. साखरवाडीचा कारखाना अडचणीत आहे. तो कारखाना लवकर अडचणीतून बाहेर यावा, यासाठी राजकारण न आणता आमचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात कारखानदारी टिकली पाहिजे. मात्र कारखानदारांनी ऊस उत्पादकांचे पैसेही वेळच्या वेळी देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. आज श्रीराम कारखान्याने सर्वात अगोदर एकरकमी ऊस उत्पादकांचे पैसे देऊन आदर्श निर्माण केला आहे, असेही रामराजेंनी स्पष्ट केले.

Web Title: Ramaraje do not fly the caller ... if you can solve the question- Ghunatharaje Naik-Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.