बुलेट ट्रेनला विरोध राहणारच--पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:45 PM2017-10-18T18:45:11+5:302017-10-18T18:53:04+5:30

कºहाड : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले

Prithviraj Chavan will remain opposed to the bullet train | बुलेट ट्रेनला विरोध राहणारच--पृथ्वीराज चव्हाण

बुलेट ट्रेनला विरोध राहणारच--पृथ्वीराज चव्हाण

Next
ठळक मुद्देशेतकºयांना सरकारने रामभरोसे सोडलेया नोटाबंदीचा परिणाम युवक, लोकांवर झाला राज्यातल्या रेल्वेच्या दुरुस्तीसाठी येणारा एक हजार कोटी खर्च करण्याऐवजी

कºहाड : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात दहा लाख शेतकºयांनाच कर्जमाफी दिली जात आहे. भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकºयांना रामभरोसे सोडले आहे. त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

कºहाड येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, एनएसयुआयचे शिवराज मोरे उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने पुकारलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. हे आम्ही सांगत आलो आहे.

शेतकरी प्रचंड संतापलेला आहे. यामागचे कारण म्हणजे कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी सरकारने लावलेल्या अटी व शर्ती हे आहे. से करून सरकारने एकप्रकारे शेतकºयांवर अविश्वासच दाखवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात शेतकºयांचे शेतीचे उत्पन्न दुप्पट करू, असे आश्वासन दिले होते. ते आता पोकळ ठरले आहे. सुरुवातीला नोटाबंदी करीत देशातील काळा पैशाचा मुद्दा समोर आणला. आता कॅशलेसचे कारण सांगितले जात आहे. मात्र, या नोटाबंदीचा परिणाम युवक, लोकांवर झाला आहे. आम्ही भाजपला मते देऊन चूक केली अशा प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत. राज्यातल्या रेल्वेच्या दुरुस्तीसाठी येणारा एक हजार कोटी खर्च करण्याऐवजी बुलेट ट्रेन कशासाठी,’ असा सवाल उपस्थित करीत या बुलेट ट्रेनला आमचा कायम विरोध आहे.’

बुलेट ट्रेनबाबत सांगताना चव्हाण म्हणाले, ‘भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी बुलेट ट्रेनची परकीय देशास आॅर्डर देण्यात आली आहे. रेल्वेच्या दुरुस्तीसाठी एक लाख कोटी खर्च येत आहे. तो करण्याऐवजी बुलेट ट्रेनसाठी पैसे खर्च केले जात आहेत.’

भाजपने राणेंचा अपमान केला..
एकेकाळी काँगे्रसमध्ये असलेले नारायण राणे हे आता पक्षाला सोडून गेले आहेत. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता. ‘काँगे्रस सोडल्यानंतर नारायण राणे भाजपाचे अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे गेले. त्यावेळी त्यांना अनेक मार्गातून अपमानीत करण्यात आले. ते करायला नको हवे होते. आज नारायण राणे पक्षात नाहीत, याचे दु:ख होत आहे.

नोटाबंदीमुळे व्यापारी संतप्त
नोटाबंदीचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गाला झाला आहे. याबाबत त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. औरंगाबाद व जालना येथील व्यापारी महासंघाच्या बैठकीस गेलो असताना तेथे भाजपच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात व्यापाºयांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला, अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

 

Web Title: Prithviraj Chavan will remain opposed to the bullet train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.