प्लीज, माझ्या पप्पांना वाचवा हो..! मयुरीची आर्त हाक : बिदालकरांची मदतीसाठी धावाधाव; शिक्षणासाठी अपघात अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:38 PM2019-06-27T23:38:10+5:302019-06-27T23:41:44+5:30

लेकीनं दहावीत ९८ टक्के गुण मिळविल्याने सर्वजण आनंदून गेले; पण त्यास कोणाची तरी दृष्ट लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एका सत्कार समारंभाहून परतत असताना दुचाकीच्या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती बोराटे यांच्या डोक्याला गंभीर मार

 Please, save my papers ..! | प्लीज, माझ्या पप्पांना वाचवा हो..! मयुरीची आर्त हाक : बिदालकरांची मदतीसाठी धावाधाव; शिक्षणासाठी अपघात अडसर

प्लीज, माझ्या पप्पांना वाचवा हो..! मयुरीची आर्त हाक : बिदालकरांची मदतीसाठी धावाधाव; शिक्षणासाठी अपघात अडसर

Next
ठळक मुद्देअशावेळी त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता मानवतेच्या दृष्टीने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.आतापर्यंत दीड लाखाची मदत बँकेत जमा झाली आहे.

दहिवडी : लेकीनं दहावीत ९८ टक्के गुण मिळविल्याने सर्वजण आनंदून गेले; पण त्यास कोणाची तरी दृष्ट लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एका सत्कार समारंभाहून परतत असताना दुचाकीच्या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती बोराटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत गेले, अशा स्थितीत जीवापाड प्रेम करणाऱ्या वडिलांची अवस्था पाहून यशस्वी मयुरीच्या तोंडून एकच आर्त हाक बाहेर पडतेय, ती म्हणजे... प्लीज माझ्या पप्पांना वाचवा हो!

बिदाल, ता. माण येथील नव महाराष्ट्र विद्या मंदिरात श्रीपती कृष्णा बोराटे हे अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून काम करतात. त्यांची मुलगी मयुरी बोराटे हिला दहावीमध्ये ९८ टक्के गुण मिळाल्याने फलटण केंद्र्रात प्रथम आली.

बिदाल गावचे नाव
उंचावले, याचा सर्वांनाच अभिमान वाटला; पण काळजाचा ठाव घेणारी वाईट घटना घडली. मयुरीला चांगले मार्कस् मिळाल्याने अनेक ठिकाणी तिचा सत्कार झाला. असाच सत्कार नायगाव, ता. खंडाळा येथून उरकून दुचाकीवरून दि. २० जून रोजी वडील श्रीपती बोराटे यांच्या सोबत घरी येत असताना त्यांचा कमिन्स कंपनीजवळ अपघात झाला. त्यामध्ये मयुरीच्या हाताला तर श्रीपती यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. अपघातात मुलगी मयुरी सुखरूप आहे; पंरतु वडील श्रीपती बोराटे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. बेशुद्धावस्थेत उपचार घेत आहेत. अशावेळी त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता मानवतेच्या दृष्टीने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.


मयुरीला मिळालेल्या गुणामुळे ती बिदालचे नाव उज्ज्वल करणार यामुळे गावात तिचे कौतुक होत होते; मात्र या घटनेमुळे तिच्याही मनावर परिणाम होणार होता, यातून सावरण्यासाठी वडिलांना बरे करण्यासाठी बिदालकरांनी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या मदत करण्याचे काम सुरू
आहे.

आतापर्यंत दीड लाख रुपये जमा..
मयुरीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बिदालकरांनी पहिल्याच दिवशी ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम गोळा केली तर दुसºयाच दिवशी पुन्हा ६२ हजार गोळा केले तर टाकेवाडीचे उद्योजक सागर घोरपडे यांनीही ५० हजारांची मदत केली. आतापर्यंत दीड लाखाची मदत बँकेत जमा झाली आहे.

Web Title:  Please, save my papers ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.