साताऱ्यांतील भाजीमंडईत एकाचा खून, जेवण खाल्ल्याच्या कारणावरुन हमालाने दगड टाकला डोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:39 PM2018-01-18T15:39:20+5:302018-01-18T15:46:18+5:30

साताऱ्यातील रविवार पेठेतील आकार हॉटेलच्या पाठीमागे भाजी मंडईत बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माझे जेवण का खाल्ले म्हणून एका हमालाने दुसऱ्या हमालाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली. यात मच्छिंद्रनाथ बळवंत कदम (वय ५०, रा. कदमवाडी, मुद्रंळ कोळे, ता. पाटण) यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आरोपी उमेश भानुदास जाधव (वय ४० रा. खराडे मसूर ता कराड) यास अटक केली आहे.

One killed in Satyaran Bhajjandai murder case | साताऱ्यांतील भाजीमंडईत एकाचा खून, जेवण खाल्ल्याच्या कारणावरुन हमालाने दगड टाकला डोक्यात

साताऱ्यांतील भाजीमंडईत एकाचा खून, जेवण खाल्ल्याच्या कारणावरुन हमालाने दगड टाकला डोक्यात

Next
ठळक मुद्देसाताऱ्यांतील भाजीमंडईत एकाचा खूनजेवण खाल्ल्याच्या कारणावरुन हमालाने दगड टाकला डोक्यात

सातारा : साताऱ्यातील रविवार पेठेतील आकार हॉटेलच्या पाठीमागे भाजी मंडईत बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माझे जेवण का खाल्ले म्हणून एका हमालाने दुसऱ्या हमालाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली.

यात मच्छिंद्रनाथ बळवंत कदम (वय ५०, रा. कदमवाडी, मुद्रंळ कोळे, ता. पाटण) यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आरोपी उमेश भानुदास जाधव (वय ४० रा. खराडे मसूर ता कराड) यास अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, फियार्दी नावराज मांबहदूर कामी हे भाजी मंडई परिसरात गुरख्याचे काम करतात. बुधवारी रात्री राखवलंदारी करत असताना भाजी विक्रेत्यांच्या पालमध्ये आरोपी उमेश जाधव याने जेवण ठेवले होते.

दरम्यान कदम याने ते जेवण खाल्ले. याचा राग मनात धरून उमेशने माझे जेवण का खाल्ले, असे म्हणून शेजारील दगड दोन्ही हातानी उचलून कदम यांच्या डोक्यात टाकला. कदम रक्तबंबाळ होऊन जागीच मयत झाले.

घटनेची माहिती सातारा पोलीसाना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी उमेश यास अटक केली. याबाबत गुन्हा दाखल करून अधिक तपस सपोनि जाधव करत आहेत.

Web Title: One killed in Satyaran Bhajjandai murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.