ना लाईट, ना मास्क नुसताच कठीण टास्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:37 AM2019-07-14T00:37:04+5:302019-07-14T00:48:14+5:30

पावसाळ्यात आपत्कालीन विभाग सज्ज असल्याचा गाजावाजा केला जातो. वास्तवात मात्र, आपत्कालीन क्रमांक निव्वळ शोभेसाठीच असल्याचा अनुभव सातारकरांना आला.

No light, no masks, just a tough task! | ना लाईट, ना मास्क नुसताच कठीण टास्क !

ना लाईट, ना मास्क नुसताच कठीण टास्क !

Next
ठळक मुद्देअग्निशामकच्या मर्यादा स्पष्ट। आपत्कालीन क्रमांकांना प्रतिसादच नाही --संडे हटके बातमी

प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : पावसाळ्यात आपत्कालीन विभाग सज्ज असल्याचा गाजावाजा केला जातो. वास्तवात मात्र, आपत्कालीन क्रमांक निव्वळ शोभेसाठीच असल्याचा अनुभव सातारकरांना आला. इनर्व्हटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर लाईट, हेल्मेट आणि मास्कशिवाय अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. कोणत्याही पुरेशा साधन सामूग्रीशिवाय मिळविलेलं हे नियंत्रण धोकादायक आणि अशास्त्रीय असेच होते.

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पोवई नाक्यावरील स्टेशनरीच्या दुकानात इनर्व्हटरचा स्फोट झाला. या स्फोटात कुणाल कदम आणि यश दगडे हे दोन युवक गंभीर जखमी झाले. स्फोटाचा आवाज आल्यानंतर रात्री उशिरा परिसरात असणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काहींनी आपत्कालीन व्यवस्थेसाठी सज्ज असणाºया शासकीय यंत्रणांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही तत्काळ प्रतिसाद दिला नाही. घटना घडल्याक्षणी याबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठीही काहींनी फोन केले. मात्र, त्यांच्यापैकी कोणालाच यश आले नाही. अखेर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क झाल्यानंतर तातडीने सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या आणि उपचार मिळाले.

स्फोट झालेल्या ठिकाणी अग्निशमन दलाचा बंब वाजत गाजत पोहोचला खरा; पण अपुºया साहित्यासह. दुकानातील वायरचे अर्थिंग होऊन टिणग्या उडत होत्या. बॅटरीतून विचित्र वासाचा धूर बाहेर पडत होता. या धुरामुळे समोरचे काही दिसत नव्हते. विशेष म्हणजे या बंबाला ना लाईट होती, ना टॉर्च. आग विझविण्यासाठी आलेल्या जवानांकडे या धुरापासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी साधा मास्कही उपलब्ध नव्हता. तोंडाला साधे रुमाल बांधून हे जवान धुराच्या लोटावर पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. अग्निशमन बंबासोबत असलेली टॉर्चही जवानांकडे नव्हती.

उपस्थित युवकांनी मोबाईल बॅटरीच्या साह्याने जवानांना दुकानाचा अंदाज घेण्यास मदत केली. बॅटरीतून बाहेर येणाºया धुरावर पाणी मारण्याऐवजी फॉग मारणे अपेक्षित होते. पण जिथं जवानांकडे मास्क, लाईट, हेल्मेट ही उपकरणे नव्हती तिथं फॉग असण्याची अपेक्षाच फोल ठरली. जवानांच्या जीवावर उदार होऊन ही आग विझविण्यात आली असली तरीही जवानांच्या जीवावरील धोका कायम आहेच. त्यामुळे आवश्यक त्या सुविधा पुरविणे गरजेचे आहे.


वाहनचालक आपले!
सातारा पालिकेत मुख्याधिकारी यांच्याबरोबर काही नागरिकांनी चर्चा करून अग्निशमन दलाकडे अपुरे साहित्य असल्याची माहिती दिली. यावर, ‘ही यंत्रणा पालिकेशी संलग्न नसल्याने
फक्त वाहनचालकाची जबाबदारी पालिकेकडे आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.


स्फोटाचा आवाज आल्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. स्फोटामुळे दुकानाचे शटर तापले होते. उपस्थित सर्वांनी जिवाची पर्वा न करता युवकांना वाचवले. मात्र, शासकीय यंत्रणा कुचकामी असल्याचं यावेळी जाणवलं. वेळेत फोन न उचलणं, दिरंगाईची उत्तर यामुळे जखमींना मदत मिळायला थोडा उशीरच झाला.
- अशोक घोरपडे, प्रत्यक्षदर्शी

Web Title: No light, no masks, just a tough task!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.