राष्ट्रवादीचं ठरेना; भाजपचं कळेना ! माढा मतदारसंघ; मुख्यमंत्री-संजय शिंदे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:48 PM2019-03-13T23:48:52+5:302019-03-13T23:49:21+5:30

माढा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरता ठरेना. तर दुसरीकडे भाजपचा बहुतांशी निर्णय राष्ट्रवादीवर अवलंबून असल्याने त्यांचंही गुमान कळेना, अशी स्थिती आहे. त्यातच

Nationalist Congress Party The BJP does not know! Madha constituency; CM-Sanjay Shinde's meeting | राष्ट्रवादीचं ठरेना; भाजपचं कळेना ! माढा मतदारसंघ; मुख्यमंत्री-संजय शिंदे यांची भेट

राष्ट्रवादीचं ठरेना; भाजपचं कळेना ! माढा मतदारसंघ; मुख्यमंत्री-संजय शिंदे यांची भेट

Next
ठळक मुद्दे मामा विधानसभेसाठी इच्छुक

नितीन काळेल।
सातारा : माढा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरता ठरेना. तर दुसरीकडे भाजपचा बहुतांशी निर्णय राष्ट्रवादीवर अवलंबून असल्याने त्यांचंही गुमान कळेना, अशी स्थिती आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली; पण मामांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे तिढा कायम असून, अशा घटनांमुळे रोज घडतंय बिघडतंय असे चित्र आहे.

मागील दोन निवडणुकीपेक्षा यंदाची माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणखी रंगतदार बनू शकते, असेच वातावरण आहे. कारण, आघाडीत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून, सतत नवनव्या उमेदवारांची नावे समोर येत आहेत. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव मागे पडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार हेच माढ्यातून उतरू पाहत होते; पण मतदारांचा वाढता विरोध पाहता त्यांनीही माढ्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे आताही राष्ट्रवादीकडून खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र रणजितसिंह यांचे नाव उमदेवार म्हणून पुढे आले; पण ठोस असे काहीच होत नाही. त्यातच प्रभाकर देशमुख यांनाही लॉटरी लागेल, असे सांगण्यात येते; पण मोहिते-पाटील हे देशमुखांचे काम करणार का? हाही प्रश्न आहे. तसेच मोहिते-पाटील पितापुत्रापैकी कोणा एकाला उमेदवारी मिळाली तर माळशिरस तालुक्यातील त्यांचे विरोधक जोरदार विरोध करणार, हे ठरलेले आहेच. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे हेही मोहिते-पाटील यांना सहकार्य करण्याची आशाही नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादीला उमेदवार देताना व निवडून आणताना यावेळी खूपच दमछाक करावी लागणार आहे. त्यासाठी सद्य:स्थितीत अनेकांना मानवणारा असा उमेदवार देणेच राष्ट्रवादीला परवडणार आहे.

दुसरीकडे भाजपचे बरेचसे गणित हे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते, त्यावर अवलंबून आहे.

मोहिते-पाटील विरोधात संजयमामा ?
माढ्यात सध्या राजकीय चित्र सतत बदलत असून, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संजयमामांना राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्याची तयारी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मोहिते-पाटील आणि संजयमामा हे कोणत्याही पक्षातून लढले तरी लढत ही रंगतदारच ठरणार, हे निश्चित; पण हे चित्र दिसणार का ? यासाठी आणखी काही दिवस जावे लागणार आहेत.
 

मुख्यमंत्र्यांपुढे तिढा...
मुख्यमंत्री आणि संजयमामा यांची मंगळवारी रात्री भेट झाल्याचे वृत्त आहे. यावेळी मामांना माढ्यातून उभे राहण्याची गळ घातली. त्यावेळी तुम्हाला उमेदवारी द्यायची असेल तर आमच्या मित्रांपैकी कोणी अपक्ष उभा राहिला तर पाठिंबा द्या, असे मामांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Nationalist Congress Party The BJP does not know! Madha constituency; CM-Sanjay Shinde's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.