mp udayanraje supporters vandalized posters of fight film | 'फाईट'वरुन वातावरण 'टाईट'; उदयनराजे समर्थकांकडून तोडफोड
'फाईट'वरुन वातावरण 'टाईट'; उदयनराजे समर्थकांकडून तोडफोड

सातारा: खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी 'फाईट' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लावलेल्या बॅनर आणि गाडीची तोडफोड केली. चित्रपटातील 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' या डायलॉगला उदयनराजे समर्थकांनी आक्षेप घेतला. राधिका पॅलेस हॉटेलमध्ये चित्रपटाची पत्रकार परिषद सुरू असताना हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.फाईट चित्रपटाविरोधात उदयनराजे समर्थक आक्रमक झाले असताना हा चित्रपट उदयनराजेंच्या विरोधात नसल्याचं स्पष्टीकरण चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिलं आहे. 'हा चित्रपट उदयनराजेंच्या विरोधात नाही. उलट त्यांची आम्हाला साथ आहे. जे घडलं ते चुकीचं होतं,' अशी भावना दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' हा डायलॉग ऐकून उदयनराजेंनी दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हिडीओत उदयनराजे एका गाडीत बसलेले दिसत आहेत. 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' हा डायलॉग ऐकताच त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. 


Web Title: mp udayanraje supporters vandalized posters of fight film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.