सकाळी वृक्षारोपण अन् सायंकाळी प्रबोधन- जागतिक पर्यावरण दिन : पालिकेने लावली हिरवीगार रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:16 AM2018-06-06T00:16:43+5:302018-06-06T00:16:43+5:30

Morning plantation and evening awakening - World Environment Day: Greening seedlings planted by the Municipal Corporation | सकाळी वृक्षारोपण अन् सायंकाळी प्रबोधन- जागतिक पर्यावरण दिन : पालिकेने लावली हिरवीगार रोपे

सकाळी वृक्षारोपण अन् सायंकाळी प्रबोधन- जागतिक पर्यावरण दिन : पालिकेने लावली हिरवीगार रोपे

Next

कºहाड : ‘स्वच्छ कºहाड सुंदर कºहाड’ असं स्वप्न बाळगत कºहाड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कºहाडकरांनी अनेक उपक्रम राबविले. त्याचबरोबर शहरवासीयांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावे व जास्तीत जास्त वृक्षलागवड व्हावी, या उद्देशाने मंगळवारी सकाळी वृक्षारोपण अन् सायंकाळी वृक्षारोपणाबाबत प्रबोधन करण्यात आले. निमित्त होतं जागतिक पर्यावरण दिनाचं. पालिका व एनव्हायरो फे्रंडस नेचर क्लबच्या वतीने मंगळवारी पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यात कºहाडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. शंभरहून अधिक सायकली घेऊन वृक्षारोपणाचा संदेश यावेळी कºहाडकरांनी दिला.

कºहाड पालिका व एनव्हायरो फे्रंडस नेचर क्लब, कºहाड अर्बन बँक यांच्या वतीने कºहाडात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. सकाळी पालिकेच्या आवारात उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती प्रियंका यादव यांच्या हस्ते नऊ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी वैभव हिंगमिरे, अतुल शिंदे, एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद, चंद्रकांत जाधव, रमेश पवार, गणपतराव कणसे, रामेश ओझा, डॉ. स्नेहल राजहंस, शरदकुमार शिंदे आदींसह पालिका पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर पालिकेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या जलतरण तलाव येथेही पंधराहून अधिक वृक्षांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आशाकिरण वसतिगृह येथे एनव्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद यांचा वनश्री पुरस्काराने इंद्रजित चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित ्रकरण्यात आले.सकाळी वृक्षारोपण केल्यानंतर वृक्षांबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून येथील विजयदिवस चौकापासून संपूर्ण शहरातून प्रबोधनपर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचा प्रारंभ उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य सभापती प्रियंका यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यात वनविभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सह्याद्री सहकारी साखर कारखाना आदींसह सामाजिक संस्था, शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप शिवाजी हौसिंंग सोसाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाला. शहरात मंगळवारी साजरा केलेल्या जागतिक पर्यावरण दिनास कºहाडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

सायकल रॅलीत तब्बल अडीचशे कºहाडकर झाले सहभागी
कºहाड पालिका व एनव्हायरो फ्रेंडस नेचर क्लबच्या वतीने मंगळवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या सायकल रॅलीस शालेय विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणप्रेमी, नागरिक अशा अडीचशे कºहाडकर सहभागी झाले होते. यावेळी झाडे लावा, झाडे जगवा, कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरण रक्षण करी, रस्त्यावर थुंकू नका, असे विविध संदेश देत त्याचे फलकही सायकलीवर लावले होते.

पर्यावरणप्रेमींचा विशेष सत्कार
पर्यावरणाचे संरक्षक करावे, वृक्षारोपण करावे, तसेच पाणी वाचवा असा संदेश देणाऱ्या व समाजोपयोगी उपक्रम राबविणाºया पंचवीस पर्यावरणप्रेमींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालिका व एनव्हायरो फ्रेंडस नेचर क्लब, तसेच कºहाड अर्बन बँकेच्या वतीने कºहाड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.


 

Web Title: Morning plantation and evening awakening - World Environment Day: Greening seedlings planted by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.