ठळक मुद्देदहा धरणांनी गाठली पन्नाशी  गेल्यावर्षी १०,६००.९ मिलीमीटर पावसाची नोंद यंदा ७,५ ८४.०१ मिलीमीटर पावसाची नोंदतुलनेत ३०१६.८९ मिलीमीटर कमी पाऊस

सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमीच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी  १२ आॅगस्ट २०१६ रोजी १०,६००.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा ७,५ ८४.०१ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. या तुलनेत यावर्षी ३०१६.८९ मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे.

जून महिन्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या पावसाने काही धरणे बºयापैकी भरले  आहेत.  सुरुवातीला जून महिन्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव  तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला. मात्र, नंतर या भागात पावसाच्या पाण्याचा एक टिपूस पडला नाही. 


गतवर्षी १२ आॅगस्ट रोजी कोयना धरणात ९३.६७ टीएमसी म्हणजे ८९ टक्के पाणीसाठा होता. मात्र, यावेळी ८७.३८ टीएमसी म्हणजे ८३.०३ टक्के पाणीसाठा आहे. धरणात गेल्यावर्षीपेक्षा ६.२९ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे.