आव्वाज नाय करायचा; ४४ यंत्रांचा वॉच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:10 AM2017-08-18T00:10:30+5:302017-08-18T00:10:30+5:30

Make a choice; 44 devices watch! | आव्वाज नाय करायचा; ४४ यंत्रांचा वॉच !

आव्वाज नाय करायचा; ४४ यंत्रांचा वॉच !

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणावर अंकुश राहावा, यासाठी जिल्हा पोलिस दलाने यंदा प्रथमच तब्बल ४४ ध्वनीमापक यंत्रे आणली असून, जिल्ह्यातील २९ पोलिस ठाण्यात ही यंत्रे देण्यात आली आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नॉईज लेवल मीटर संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील १३० निवडक अधिकारी आणि कर्मचाºयांना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले होते. गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत
असते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या यंत्रामुळे वचक बसावा तसेच न्यायालयाच्या आदेशाचेही पालन व्हावे, हा अधिकाºयांना व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यापाठीमागचा हेतू होता.
हे मशीन कसे हाताळावे, रिडींग कसे घ्यावे, कोर्टात खटला कसा पाठवावा, याची इत्थंभूत माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी जिल्ह्यात केवळ १५ आवाज ध्वनी मापक यंत्रे होती. त्यावेळी गणेशोत्सव कालावधीत कमी यंत्रे असल्यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती.
जानेवारी महिन्यामध्येच पोलिसांनी आणखी नवी यंत्रे मागविली. जिल्हा पोलिस दलाकडे आता एकूण ४४ यंत्रे झाली असून, पोलिसांचे काम आता सोपे
झाले आहे.
बºयाचदा ध्वनीमापक यंत्राने प्रदूषणाची पातळी तपासली तरी त्यातील नेमकी माहिती काही मोजक्याच अधिकाºयांना माहित होती. हे अधिकारी तपासावर अथवा रजेवर असल्यानंतर अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे यंदा सरसकट प्रत्येक पोलिस ठाण्यातील तीन ते चार अधिकारी आणि कर्मचाºयांना ध्वनीमापक यंत्र कसे हाताळावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले.
न्यायालयात बाजू मांडण्यासाठी प्रमाणपत्र !
न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर तपासी अधिकाºयाला आरोपीच्या वकिलांकडून उलटसुलट प्रश्न केले जातात. ‘तुम्ही ध्वनीमापकचे प्रशिक्षण घेतले होते का, तुमच्याकडे रितसर प्रमाणपत्र आहे का,’ असे बरेच प्रश्न विचारण्यात येत होते. त्यामुळे पोलिसांचा नाईलाज होत होता. यावर उपाय म्हणून पोलिसांनी प्रशिक्षणावर भर दिला.
एवढेच नव्हे तर ध्वनी माफक यंत्र कसे हाताळावे, याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे पोलिस आपली बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडतील, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Make a choice; 44 devices watch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.