महाबळेश्वरमध्ये पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, मुलासमोर थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:28 PM2018-12-06T13:28:48+5:302018-12-06T13:33:03+5:30

पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकाने पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर स्वत:वर देखील वार करून आत्महत्या केली. खळबळजनक ही घटना कोयना लॉजिंगमध्ये गुरुवारी पहाटे उघडकीस आली.

Mahabaleshwar murdered wife, husband's suicide, child thunder | महाबळेश्वरमध्ये पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, मुलासमोर थरार

महाबळेश्वरमध्ये पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, मुलासमोर थरार

Next
ठळक मुद्देमहाबळेश्वरमध्ये पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, मुलासमोर थरार पुण्याहून फिरायला आलेल्या पर्यटकाचे कृत्य

महाबळेश्वर : पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकाने पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर स्वत:वर देखील वार करून आत्महत्या केली. खळबळजनक ही घटना कोयना लॉजिंगमध्ये गुरुवारी पहाटे उघडकीस आली.

अनिल सुभाष शिंदे (वय ३४, रा. वडार सोसायटी आॅफिसजवळ धानोरी रोड विश्रांतवाडी पुणे), तर पत्नी सीमा (३०) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, पुणे येथील अनिल शिंदे हे पत्नी सीमा, मुलगा आदित्य याच्यासह बुधवारी महाबळेश्वर येथे फिरायला आले. तिघेही सायंकाळी कोयना लॉजिंगमध्ये त्यांच्या खोलीत परतले. मध्यरात्री एकच्या सुमारास लॉजिंग मालकाला खोलीतून आवाज आल्याने त्याने रुमच्या दिशेने धाव घेतली.

खोली आतून बंद होती. तेव्हा आवाज दिला असता मुलगा आदित्यने खोली उघडली. त्यावेळी दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांनी पोलीस तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला याची माहिती दिली.

दोघानांही महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ठसेतज्ज्ञांना गुरुवारी सकाळी पाचारण करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

मुलगा घाबरलेला

पत्नीचा खून करून आत्महत्या करण्याचा थरार मुलगा आदित्य याच्यासमोरच सुरू होता. लॉज मालकाने आवाज दिला असता त्याने दरवाजा उघडला. हा प्रकार पाहून तोही घाबरला आहे.

Web Title: Mahabaleshwar murdered wife, husband's suicide, child thunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.