ठळक मुद्देबिबट्याचा बछडा विहिरीत पडलावन अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी

उंब्रज : कऱ्हाड तालुक्यातील खालकरवाडी येथील पट्टी नावाच्या शिवारात गुरुवारी सकाळी बिबट्याचा बछडा विहिरीमध्ये आढळून आला. नागरिकांनी तातडीने वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या बिबट्याला विहिरीबाहेर काढले. खालकरवाडी येथील पट्टी नावाच्या शिवारात पांडुरंग शिंदे यांचे शेत व विहीर आहे. वाटेकरी पांडुरंग गाडे हे गुरुवारी सकाळी विहिरीवर गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीत बिबट्याचा बछडा पडलेला दिसून आला. त्यांनी तातडीने नागरिकांना कल्पना दिली.

यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला. वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी तेथे पोहोचले. त्यानंतर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला विहिरीबाहेर काढले. 


Web Title: The leopard fell into the well, the forest officer, the employee at the spot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.