बीजगुणन केंद्राची जमीन पडीक -: निधीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:15 PM2019-07-12T22:15:57+5:302019-07-12T22:16:32+5:30

याठिकाणी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने भात, सोयाबीन, ऊस आदी पिकांपासून बियाण्यांची निर्मिती केली जाते.

Land of Bijubeanan Kendra | बीजगुणन केंद्राची जमीन पडीक -: निधीचा अभाव

बीजगुणन केंद्राची जमीन पडीक -: निधीचा अभाव

googlenewsNext
ठळक मुद्देकाळोलीत चौदा हेक्टरमध्ये झुडपे, वेलींचे साम्राज्य; पाणीही साचले

नीलेश साळुंखे ।
कोयनानगर : काळोली, ता. पाटण येथे गुहाघर-विजापूर महामार्गाच्या दुतर्फा कृषी चिकित्सालय कार्यालय व बीजगुुणन केंद्र आहे. याठिकाणी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने भात, सोयाबीन, ऊस आदी पिकांपासून बियाण्यांची निर्मिती केली जाते. सध्या या बीजगुणन केंद्रातील सुमारे चौदा हेक्टर शेत जमिनीची पड झाली असून, झाडेझुडपे व गवताने ही जमीन व्यापली आहे. शासकीय निधी उपलब्ध नसल्याने या जमिनीत पिके घेतली जात नाहीत.

काळोलीतील कृषी केंद्राकडे सुमारे चौदा हेक्टर जमीन असून, कार्यालयीन जागा व रस्त्याची जागा सोडून सर्व ठिकाणी बीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये भात, सोयाबीन, ऊस आदी पिके घेतली जातात. यावर्षी खरीप हंगामातील पेरण्या उरकत आल्या तरी बीजगुणन केंद्रात कोणतीही हालचाल दिसत नाही. शेतात वाढलेले गवत, साचलेली पाण्याची तळी पाहून शेतांची पेरणीपूर्व मशागत केली नसल्याचे दिसते. याबाबत अधिक माहिती घेतली असता राज्यातील विविध ठिकाणची शेती खर्चाची देयके बाकी असल्याच्या कारणाने चालू वर्षी बीजगुणन केंद्रात खरीप हंगामातील पिके घेतली जाणार नसल्याची माहिती समोर आली. यामुळे विविध ठिकाणची शेकडो एकर शेती पडून राहणार आहे.

काळोली येथे राज्य शासनाच्या कृषी विभागाचे तालुक्याचे मुख्य कार्यालय असल्याने याठिकाणी विविध प्रशिक्षण शिबिरे, शेती उपकरण, अवजार यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते. यामुळे येथे नेहमीच शेतकऱ्यांचा राबता असतो. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासह प्रयोगशील शेतीचे धडे देणाºया कृषी पंढरीतील शेतीची पड पाहून अंचबित वाटत आहे. बीजगुणन केंद्राची बारमाही वाहणाºया कोयना नदीवरील पाण्याची योजना सुपीक काळी जमीन कृषी पदवी घेतलेले कर्मचारी असूनही जमीन पडून राहत आहे. चालूवर्षी शेती पडून राहिल्यास त्यातून बियाणापोटी मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडणार आहे. तर आता पडीक जमिनीमुळे पाळीव जनावरे मोकाटपणे चरण्यासाठी फिरत आहेत. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. तर पीक नसल्याने आणि बांधांवर मातीची भर नसल्याने ते फुटण्याची शक्यता आहे.

गवत व वेली, काटेरी झाडेझुडपे वाढत असल्याने पुन्हा ही शेती पीक घेण्यायोग्य करण्यासाठी शेती खर्चाच्या तिप्पट खर्च येणार आहे. जसजसे दिवस जातील, तसा हा खर्च वाढतच जाणार असून याबाबत ठोस कार्यवाही होणे गरजेचे आहे. वरिष्ठ पातळीवर सकारात्मक दृष्टीने पाहून या भूमातेतून बीजरुपी सोनं पिकवावे, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.

 

आॅगस्ट महिन्यात पाडेगाव संशोधन केंद्राकडून ऊस बियाणे घेऊन वर्षभर होणारा खर्च उधारीवर करण्यात येणार आहे. बियाणे विक्री झाल्यानंतर खर्चाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. मात्र, पावसाने उघडीप दिली तरच मेहनतीचे काम होणार आहे. तसेच महाबीजने भाताचे तरू उपलब्ध केले तर भात लागण करून पिकवलेले धान्य महाबीजला विक्री करायचे, या अटीवर भाताची लागण होणार आहे.
- एस. बी. बोराटे
कृषी सहायक, कºहाड


काळोली, ता. पाटण येथे असलेली बीजगुणन केंद्राची जमीन पडीक असून, त्याठिकाणी सध्या झुडपे, वेली वाढल्या आहेत.

Web Title: Land of Bijubeanan Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.