लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : कन्यागत पर्वाची मंगळवारी सांगता झाल्यानंतर कृष्णामाई नदीला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी नेसविण्यात आलेली होती. ती बुधवारी नदीतून बाहेर काढण्यात आली. नदीतून बाहेर काढलेली साडी ही सैदापूर, प्रीतिसंगम घाट परिसरातील गरीब व स्वच्छता करणाºया गरजू महिलांना दान करण्यात आली.
कन्यागत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. विनायक गरुड, सचिव विश्वनाथ जोशी, सुधीर कुलकर्णी, पराग देशमुखे, मनोहर इनामदार, अग्निशामक दलाचे अनिल डुबल, उत्तम डेस्के, आनंद माने आदी अग्निशामक दलाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष नदीतील साडी काढण्यास प्रारंभ करण्यात आला. कन्यागत पर्व समितीतील पदाधिकाºयांसह कर्मचाºयांनी बोटीच्या साह्याने कृष्णानदी पात्रातून पलीकडे जात तेथील साडी घेऊन परत आले. सुमारे दोन तास इतका वेळ साडी काढण्यासाठी लागला. सकाळी साडेअकरा वाजता सुरू करण्यात आलेले काम हे दुपारी दीड ते दोन वाजता संपविण्यात आले. साडी काढल्यानंतर ती यावेळी उपस्थित सहा ते सात महिलांनी वेगवेगळी केली. तसेच त्या साड्या उन्हामध्ये सुकविण्यात आल्या. त्यानंतर त्यांची एकत्रित घडी घालण्यात आली. यावेळी या कामास वेदांत करिअर अ‍ॅकॅडमीचे सोळा विद्यार्थी तसेच परिसरातील महिलांनीही सहकार्य केले.
एकूण १२५ साड्या एकत्रित करून तयार करण्यात आलेली साडी नेसविल्यात आल्याने ती विभक्त करण्यासाठी महिला तसेच
सदस्यांना दोन ते तीन इतका तास वेळ लागला. विभक्त केलेल्या साड्यांपैकी २५ साड्या या सैदापूर येथील ग्रामस्थांना देण्यात आल्या.
तसेच प्रीतिसंगम घाट परिसरातील पालिकेच्या व इतर सफाई करणाºया महिलांना २५ साड्यांचे वाटप करण्यात आले. यातून इतर बाकी राहिलेल्या साड्यांचे वाटपही करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कन्यागत पर्व काळात तेरा महिने रोज नदीची आरती
बारा वर्षातून एकदा आलेल्या कन्यागत पर्व काळात कºहाडच्या कृष्णा नदीकाठी १२ आॅगस्ट २०१६ रोजी महाआरतीने प्रारंभ करण्यात आला होता. त्यादिवसापासून आजपर्यंत तेरा महिने दररोज न चुकता सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नदीचे पूजन करून आरती करण्याचे सुरू होते.
धार्मिक विधीबरोबर नदी स्वच्छतेकडेही लक्ष
१२ आॅगस्ट२०१६ रोजी कन्यागत महापर्वास प्रारंभ करण्यात आला. त्याची सांगता मंगळवारी १२ सप्टेंबर २०१७ रोजी कृष्णामाई नदीस साडी नेसवून तसेच १०१ कन्यापूजनाने झाली. यावेळी कन्यागत समितीच्यावतीने करण्यात आलेल्या धार्मिक विधीबरोबर नदी स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्यात आले. समितीच्यावतीने नदीस साडी नेसवून तसेच महाआरती करण्यात आली.