खंडाळा (सातारा), दि. 13 - मुलीला दाखविण्याचा कार्यक्रम उरकून कामाच्या गावी निघालेल्या बहिणभावाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकरले. यामध्ये सख्या बहिणभावाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे-बंगलोर महामार्गावर खंबाटकी घाटात नाथ मंदिराजवळ वळणावर रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला. आप्पा बाजीराव बामणे (वय ३८) व लक्ष्मी नानासाहेब चव्हाण (४०, सध्या रा. खानापूर, ता. वाई मूळगाव वाणेवाडी, ता. बारामणी) असे ठार झालेल्यांची नावे आहेत.