उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमींकडून कळसूबाई शिखर सर

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, November 09, 2017 5:06pm

उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमी असलेल्या दहाजणांच्या मित्र समूहाने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले. केवळ अडीच तासांत ही मंडळी न थकता शिखरावर पोहोचली.

पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमी असलेल्या दहाजणांच्या मित्र समूहाने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर नुकतेच सर केले.

अमोल आवळे, अ‍ॅड. किशोर खराडे, सदाशिव बेळगुंपे, संजय गंगावणे, धनंजय माने, नितीन चव्हाण, रामचंद्र काळोखे, चंद्र्रकांत चव्हाण, कोरडे, भांगरे या निवडक सवंगड्यांनी नुकतेच राज्यातील सर्वाधिक उंच असलेले अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई हे शिखर सर केले.

केवळ अडीच तासांत ही मंडळी न थकता शिखरावर पोहोचली. या सर्वांनाच दुर्ग भ्रमंतीची प्रचंड आवड आहे. सातत्याने जोगमठ, जरंडेश्वर, हरेश्वर, चंदन-वंदन, कल्याणगड इथे ही मंडळी जात असतात. याशिवाय राजगड, रायरेश्वर, वासोटा, नागेश्वरी या ठिकाणांनाही भेटी दिल्या आहेत.

यातील काहीजण वयाची पन्नाशी गाठलेले आहेत. मात्र, त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. कळसूबाई शिखरावर पोहोचल्यावर सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रत्येक दुर्गप्रेमी तरुणांनी एकदा तरी हे शिखर सर करावे, असे आवाहन सर्वांनी यावेळी केले.

संबंधित

रायगडमधील पर्यटनस्थळांसाठी १३७ कोटींचा निधी
थायी, बुद्धिस्ट टुरिझम वाढीला प्राधान्य
प्रवाश्यांच्या हुशारीमुळे चोरटे आले पोलिसांच्या जाळ्यात 
देहूरोड येथे महामार्गावरच बंद पडली शिवनेरी बस 
आयुष्यभरासाठी स्मरणात राहील देशातील या ५ रोडवरील प्रवास

सातारा कडून आणखी

तीस वर्षांत तब्बल साडेचार कोटी ग्रंथांची छपाई
सातारा जिल्ह्यात प्रथमच दोन वन उद्यानांची निर्मिती
कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर उचलण्यात आले
आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, उदयनराजे भोसलेंनी केले हे आवाहन
‘कमळा’वर कोणते औषध फवारायचे हे ठरवावे--राजू शेट्टी

आणखी वाचा