उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमींकडून कळसूबाई शिखर सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 05:06 PM2017-11-09T17:06:54+5:302017-11-09T17:12:10+5:30

उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमी असलेल्या दहाजणांच्या मित्र समूहाने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले. केवळ अडीच तासांत ही मंडळी न थकता शिखरावर पोहोचली.

Kalsubai Shikhar Sir from Uttar Pradesh's Durgaprimi | उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमींकडून कळसूबाई शिखर सर

उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमींकडून कळसूबाई शिखर सर

googlenewsNext
ठळक मुद्देदहाजणांच्या मित्र समूहाने सर केले राज्यातील सर्वात उंच शिखर केवळ अडीच तासांत न थकता गाठले शिखर

पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमी असलेल्या दहाजणांच्या मित्र समूहाने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर नुकतेच सर केले.


अमोल आवळे, अ‍ॅड. किशोर खराडे, सदाशिव बेळगुंपे, संजय गंगावणे, धनंजय माने, नितीन चव्हाण, रामचंद्र काळोखे, चंद्र्रकांत चव्हाण, कोरडे, भांगरे या निवडक सवंगड्यांनी नुकतेच राज्यातील सर्वाधिक उंच असलेले अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई हे शिखर सर केले.

केवळ अडीच तासांत ही मंडळी न थकता शिखरावर पोहोचली. या सर्वांनाच दुर्ग भ्रमंतीची प्रचंड आवड आहे. सातत्याने जोगमठ, जरंडेश्वर, हरेश्वर, चंदन-वंदन, कल्याणगड इथे ही मंडळी जात असतात. याशिवाय राजगड, रायरेश्वर, वासोटा, नागेश्वरी या ठिकाणांनाही भेटी दिल्या आहेत.

यातील काहीजण वयाची पन्नाशी गाठलेले आहेत. मात्र, त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. कळसूबाई शिखरावर पोहोचल्यावर सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रत्येक दुर्गप्रेमी तरुणांनी एकदा तरी हे शिखर सर करावे, असे आवाहन सर्वांनी यावेळी केले.

Web Title: Kalsubai Shikhar Sir from Uttar Pradesh's Durgaprimi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.