‘काकां’ची निवृत्ती आता नव्या नेतृत्वाचा ‘उदय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:00 PM2018-04-26T23:00:27+5:302018-04-26T23:00:27+5:30

Kakan's retirement now 'emergence' of new leadership | ‘काकां’ची निवृत्ती आता नव्या नेतृत्वाचा ‘उदय’

‘काकां’ची निवृत्ती आता नव्या नेतृत्वाचा ‘उदय’

googlenewsNext

प्रमोद सुकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : ‘येणारी विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही,’ अशी जाहीर स्पष्टोक्ती माजीमंत्री विलासराव पाटील काकांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिलीय. खरंतर त्यामुळे त्यांच्या काही जुन्या निष्ठावंतांच्यात अस्वस्थताही पसरलीय म्हणे. पण त्यांचे सुपुत्र वकीलदादांनी मात्र उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. पण रयत संघटनेच्या ताब्यात पुन्हा आमदारकी आणण्यासाठी कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. परिणामी दक्षिणच्या राजकारणात उंडाळकर ‘काकां’ची राजकीय एक्झीट अन् आता नव्या नेतृत्वाचा ‘उदय’ याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
कºहाड दक्षिणच्याच नव्हे तर अनेक वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर गारूड घालणारं एक नेतृत्व म्हणजे विलासराव पाटील-उंडाळकर. कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघातून एकदा नव्हे तर तब्बल सातवेळा विधानसभेची निवडणूक जिंकून एक वेगळा इतिहास रचणारे नेतृत्व म्हणजे विलासराव उंडाळकर. जिल्ह्याच्या राजकारणात कधीही कितीही प्रसंग आला बाका तर त्यावर उपाय काढणारे नेतृत्व म्हणजे विकासकाका अशी त्यांची एक काळ ख्याती होती.
मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ‘पृथ्वी’राज अवतरल्यानंतर उंडाळकरांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने घरघर लागली, असे म्हणावे लागेल.
गत विधानसभा निवडणुकीत विजयाची सप्तपदी पार पाडलेल्या उंडाळकर काकांना काँगे्रसच्या उमेदवारीपासून ‘हात’भर अंतरावर ठेवण्यात आले. मात्र, हे पचनी न पडलेल्या उंडाळकरांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातच दंड थोपटले. त्यांच्या बंडखोरीच्या गाडीला राष्ट्रवादीने ‘चावी’ दिली. तर पृथ्वीबाबांच्या गाडीतून उतरलेल्या भोसले बाबांनी ‘कमळ’ हातात घेतल्याने तिरंगी लढतीत पृथ्वीबाबांनी बाजी मारली. आणि उंडाळकर गट दक्षिणेतल्या राजकारणातही बॅकफूटवर गेला. तेव्हापासून उंडाळकर गटाच्या आमदारकी पुन्हा
ताब्यात घेण्यासाठी जोरबैठका सुरू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून विलासकाका उंडाळकरांच्या सार्वजनिक जीवनाची पन्नास वर्षे असा एक कार्यक्रम आयोजित करून त्याला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख पाहुणे म्हणून असणारी उपस्थिती बोलकी आहे.
त्याही पुढे जाऊन स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उंडाळे येथील आयोजित कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांची असणारी उपस्थितीही बरंच काही सांगून जातं.

आमदार रयत संघटनेचा की विचाराचा..
येणाºया विधानसभा निवडणुकीत आमदार आपलाच असेल, असे उंडाळकर सांगतायंत. पण हा आमदार रयत संघटनेचा, संघटनेच्या विचाराचा की रयत संघटनेला बरोबर घेणारा असेल, याबाबत तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
‘नियोजन’ चुकलं...
विलासराव पाटील-उंडाळकर यांचे राजकीय वारसदार म्हणून अ‍ॅड. उदय पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी गत जिल्हा परिषद निवडणुकीत येळगाव गटातून सदस्य म्हणून विजयी होऊन आपली एन्ट्री केली. मात्र, जिल्हा नियोजन समितीपासून त्यांना दूरच ठेवण्यात आलं. त्यामुळे विलासराव उंडाळकरांचे राजकीय नियोजन चुकल्याची चर्चा आजही तालुक्यात सुरू आहे.
‘बाबा’ अन् ‘काका’ एकत्रीकरणाची चर्चा
जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी हाक काँगे्रसने दिली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी तर काँग्रेसमध्ये असूच नये, अशी ज्येष्ठांची भावना आहे. उंडाळकरही ‘मी काँगे्रस विचाराचाच पाईक आहे,’ असेच नेहमी सांगतात. त्यामुळे दक्षिणेतील काँगे्रसचे ‘बाबा’ ‘काका’ गट एकत्रित येणार, अशी चर्चा आहे.
एकमेकांवरील टीका टाळली जातेय
कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघात आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर दोघांचेही कार्यक्रम सध्या सुरू आहे. यापूर्वी यांच्या व्यासपीठावरून परस्परांवर टीकेची झोड उठवली जायची. सध्या मात्र, दोघांच्याही व्यासपीठावरून फक्त भाजप आणि सेनेला टार्गेट केल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Kakan's retirement now 'emergence' of new leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.