सुटीचा दिवस कृष्णेच्या स्वच्छतेसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:42 PM2018-12-09T22:42:36+5:302018-12-09T22:42:59+5:30

वाई : तालुक्याची भाग्यरेषा असणाऱ्या कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सेवाकार्य ...

Holidays Day Cleanliness of Krishna | सुटीचा दिवस कृष्णेच्या स्वच्छतेसाठी

सुटीचा दिवस कृष्णेच्या स्वच्छतेसाठी

Next

वाई : तालुक्याची भाग्यरेषा असणाऱ्या कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सेवाकार्य समिती पुढे आली असून, सुटीच्या दिवशी दर रविवारी सकाळी तीन तास कृष्णा नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
कृष्णा नदीच्या स्वच्छतेत पालिका प्रशासनाबरोबर वाईकरांचा मोठा सहभाग असणे आवश्यक असताना कसलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वाईकरांनी स्वत:हून पुढे येऊन स्वच्छता मोहीम हाती घेतलीय. यामध्ये काही नगरसेवकांचाही समावेश आहे. कृष्णा नदी सेवाकार्य समितीचे मोजकेच कार्यकर्ते नदीच्या स्वच्छतेसाठी झटत असल्याचे पाहून अनेक वाईकर या मोहिमेत उत्स्फूर्त सहभागी झाले आहेत. त्यामुळे नदीच्या घाटावरील स्वच्छता होण्यास वेळ लागत नाही.
दर रविवारी एकाच वेळी वाई शहर परिसरातील सर्वच घाट साफ करता येत नाहीत, त्यामुळे दर रविवारी एका घाटाची स्वच्छता हाती घेण्यात येत आहे.
आतापर्यंत कित्येक ट्रॉल्या कचरा नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. भीमकुंड आळीतील बदामी तळ्यासाठी सेवाकार्य समितीचे सदस्य गेले दोन महिने त्या ठिकाणी काम करीत आहेत. गंगापुरी घाटापासून भद्रेश्वर मंदिरापर्यंत नदीपात्रात अनेक ऐतिहासिक कुंड दगडात कोरलेले आहेत. ते सर्व स्वच्छता मोहिमेमुळे वाईकरांना समजले आहेत. ते कायमस्वरुपी स्वच्छ ठेवण्यासाठी वाईकरांसह प्रशासनाचा सहभाग महत्त्वाचा आहे. पालिका प्रशासनाने नदीच्या स्वच्छतेविषयी ठोस भूमिका न घेतल्याने ऐतिहासिक, सांस्कृतिक वाई शहराची शान असणाºया कृष्णा नदीला स्वच्छ ठेवताना वाईकरांची दमछाक होत आहे.
नदीत सोडले जाणाºया सांडपाण्याची व्यवस्था कायमस्वरुपी करण्यासाठीचे काम चालू झाले आहे. तरीही काही विघ्नसंतोषी लोकांकडून त्याला खीळ घालण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
महाबळेश्वरला उगम पावणाºया कृष्णा नदीवर लाखो लोकांची तहान भागविणारे मोठे प्रकल्प आहेत. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या धोम व बलकवडी धरणामुळे वाई, खंडाळा, फलटण, कोरेगावसह सांगली पर्यंतची शेती निव्वळ या प्रकल्पामुळे सिंचनाखाली आलेली आहे. इतर तालुक्यातील लोकांचे संसार उभे करताना मात्र कृष्णामाईला त्याची किंमत मोजावी लागत आहे. तिच्यामुळे शेतीमध्ये जलक्रांती होऊन चार ते पाच तालुक्यांतील लोकांचे जीवनमान उंचावले आहे. धोमपासून कºहाडपर्यंत कृष्णा नदीपात्राच्या शेजारील वस्तीतून, शहरातून या गावातून येणारे सांडपाणी सरळ कृष्णा नदीत सोडण्यात येत असल्याने पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येऊन काठावरच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सेवाकार्य समिती कृष्णा स्वच्छतेसाठी पुरी पडू शकत नाही, यासाठी वाईकरांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. वाई शहरातील सेवाकार्य समितीसारख्या काही ठराविक संस्था जलपर्णी बिमोडासाठी उतरल्या असून, त्यांना काही प्रमाणात यश आले आहे.
पालिका कशाची वाट पाहतंय?
पालिका प्रशासन कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी ठोस भूमिका घेण्यासाठी कशाची वाट पाहतंय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सध्या तरी सेवाकार्य समितीची धडपड पाहून अनेकजण या कृष्णानदी स्वच्छता मोहिमेत उतरत आहेत.परंतु पालिकेकडून अद्याप कसल्याही हालचाली झाल्या नाहीत. आठवड्यातून एकदा मिळणारी सुटीही वाईतील नागरिक नदी स्वच्छ करण्यासाठी घालवत आहेत. हे पालिकेला कस समजणार?

Web Title: Holidays Day Cleanliness of Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.