महामार्गाने दोन तासांनंतर घेतला मोकळा श्वास; दोन क्रेनच्या मदतीने वाहन हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:42 PM2018-05-20T12:42:23+5:302018-05-20T12:42:23+5:30

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या बदेवाडी हद्दीत रविवारी सकाळी चालकाचा ताबा सुटल्याने एक कंटेनर रस्ता दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाला

The highway took two hours after breathing; Deletion of vehicle with the help of two cranes | महामार्गाने दोन तासांनंतर घेतला मोकळा श्वास; दोन क्रेनच्या मदतीने वाहन हटविले

महामार्गाने दोन तासांनंतर घेतला मोकळा श्वास; दोन क्रेनच्या मदतीने वाहन हटविले

googlenewsNext

पाचवड (सातारा) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या बदेवाडी हद्दीत रविवारी सकाळी चालकाचा ताबा सुटल्याने एक कंटेनर रस्ता दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाला. यामुळे पुण्याकडून साता-याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दोन क्रेनच्या मदतीने हा कंटेनर बाजूला केला. त्यामुळे दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

याबाबत माहिती अशी की, उन्हाळ्याची सुटी त्यातच रविवारची साप्ताहिक सुटी असल्याने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच रविवारी सकाळी सातारा दिशेने जाणारा कंटेनर (टीएस ०१ बीके ९०७९) या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो दुभाजकास धडक देऊन रस्त्यावर आडवा झाला. अपघातानंतर चालक पळून गेला. त्यानंतर महामार्ग पोलीस व भुईंज पोलीस यांनी महामार्ग क्रेन व मदत पथकाने कुंटेनर बाजूला काढून वाहतूक सुरुळीत केली. तोपर्यंत वाहनचालक व प्रवासी यांना मनस्ताप सहन करावा लागला.

Web Title: The highway took two hours after breathing; Deletion of vehicle with the help of two cranes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.