केसांचा फुगा.. सगळे बघतायत टकामका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:27 PM2018-06-17T23:27:44+5:302018-06-17T23:27:44+5:30

Hairdresser .. looking for everyone! | केसांचा फुगा.. सगळे बघतायत टकामका!

केसांचा फुगा.. सगळे बघतायत टकामका!

Next

योगेश घोडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अलीकडे क्रिकेट सामने झाले. यामध्ये विराट कोहलीने आपल्या स्टाईलमध्ये बदल करत दाढी ठेवली तर हार्दिक पंड्यानं चक्क आपले केस उभे केले, याचे अनुकरण आख्ख्या टीमनं करू पाहिलं.. त्यानंतर हळूहळू देशातील युवा पिढीमध्ये केस आणि दाढी वाढवून विविध प्रकारचे कट मारण्याची के्रझ वाढत गेली. पूर्वी चित्रपट पाहून समाज त्याचे अनुकरण करत होता. मात्र, आता खेळाडूंना पाहून समाज त्याचे अनुकरण करत आहे. जसा काळ बदल गेला तसा वेशभूषा अन् हेअर कट करण्याची नवनवीन पद्धत रुढ होत गेली.
काही दिवसांपूर्वी आयपीएलचे सामने झाले. तसेच सध्या फूटबॉलचा हंगाम सुरू आहे. यातील खेळाडूंच्या हेअर स्टाईलचे अनुकरण युवापिढी करत आहे. सध्या नवीन हेअर स्टाईलमध्ये वनसाईड कट हा स्टाईल फेमस आला आहे. ही स्टाईल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात रुजली गेली आहे. आयपीएलमध्ये जो खेळाडू चमकला किवा त्याने मॅच जिंकून दिली, त्या खेळाडूवर युवा क्रिकेटप्रेमी अतोनात पे्रम करत. तसेच त्याचे कपडे, हेअर स्टाईलचे अनुकरण करत. या खेळाडूंमध्ये विराट कोहली, हार्दिक पंड्या तसेच वेस्ट इंडिजच्या संघामधील ब्रावो, आंद्रे रसल या खेळाडूंची हेअर स्टाईलही वनसाईड होती.
१९८० दशकामध्ये हिप्पी केसांची स्टाईलही प्रथम प्रसिद्ध अभिनेता राजेश खन्ना यांनी आणली. त्यानंतर अभिताब बच्चन, मिथून चक्रवर्ती यांनी ही स्टाईल पुढे रुजवली. त्या काळच्या युवा वर्गाने हीच स्टाईल उचलली. मात्र, कालांतराने ही स्टाईल कमी होत गेली आणि शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण यांच्या हेअर स्टाईल आल्या. तिही स्टाईल युवा वर्गाने वापरात आणली.
हिप्पी स्टाईल ही केली की कानावर केसं येत असत. हिप्पी स्टाईल करण्यासाठी केसं दाट असावी लागतात. ही स्टाईल करताना केसं थोडीशी कमी करावी लागतात. त्यामुळे ही स्टाईल उठावदार दिसते. जसा काळ बदलत गेला तशी हेअर स्टाईलही बदलत गेली. सेलिबे्रटी हेअर स्टाईल करतात. तीच हेअर स्टाईल युवा वर्ग करत आहे. सध्या वनसाईडची के्रझ आहे. ही स्टाईल खेळाडू यांच्यापासून आली असून, स्टाईलमध्ये वेगवेगळी डिझाईन केली जात आहे. ही स्टाईल करताना हाताचे काम कमी झाले आहे. युवामध्ये सध्या वनसाईड स्टाईलची मोठी क्रेझ आहे.
सध्या दाढीच्या स्टाईलची के्रझ
आता हेअरबरोबर दाढीची स्टाईलही बदलल्याने वारंवार दाढी करावी लागते. काहीजण दाढी वाढवत आहेत; पण ही दाढी चेहऱ्याला शोभावी, त्यामुळे कोरण्याची स्टाईल आली आहे. दाढी करण्यासाठी सात ते दहा मिनिटे लागतात. मात्र दाढी कोरण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात.

Web Title: Hairdresser .. looking for everyone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.