गोंदवलेकर महाराजाच्या समाधीवर पुष्पवृष्टी, दहा दिवसांच्या सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:45 AM2017-12-12T11:45:29+5:302017-12-12T11:50:47+5:30

रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, या नामस्मरणाने श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०४ वा पुण्यतिथी महोत्सव व समाधीवर गुलाल-फुले वाहण्याचा मुख्य सोहळा मंगळवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी पार पडला. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक भल्या पहाटे दाखल झाले होते. गुलाल-पुष्प वाहून सोहळ्याची सांगता झाली.

In the Gondavalekar Maharaja's Samadhi, on the occasion of flowering, 10-day celebrations, | गोंदवलेकर महाराजाच्या समाधीवर पुष्पवृष्टी, दहा दिवसांच्या सोहळ्याची सांगता

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०४ वा पुण्यतिथी महोत्सव व समाधीवर गुलाल-फुले वाहण्याचा मुख्य सोहळा मंगळवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी पार पडला.

googlenewsNext
ठळक मुद्देश्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०४ वा पुण्यतिथी महोत्सव रघुपती राघव राजारामचा जयघोष पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी पार पडला समाधीवर गुलाल-फुले वाहण्याचा सोहळा पुणे-मुंबईसह राज्यांतून भाविक मुक्कामी दाखल झाले

दहिवडी (सातारा) : रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, या नामस्मरणाने श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०४ वा पुण्यतिथी महोत्सव व समाधीवर गुलाल-फुले वाहण्याचा मुख्य सोहळा मंगळवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी पार पडला. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक भल्या पहाटे दाखल झाले होते. गुलाल-पुष्प वाहून सोहळ्याची सांगता झाली.



गेली दहा दिवस विविध गायन, कीर्तन सेवा, नामस्मरण व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समाधीवर फुले वाहण्यासाठी रात्रीपासून पुणे-मुंबईसह राज्यांतून भाविक मुक्कामी दाखल झाले आहेत.

भाविकांच्या गर्दीने गोंदवलेनगरी भक्तिमय वातावरणाने फुलून गेली. भाविकांची गर्दी पाहता दहिवडी, म्हसवड, सातारा मार्गाकडून होणारी वाहतूक वळविण्यात आली आली होती.


मंदिरात रात्रभर भजन, कीर्तन, प्रवर्चन, भक्तीगितांचे गायन, नामस्मरण केले जात होते. पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी उपस्थित हजारो भाविकांनी गुलाल-पुष्प अर्पण केले. त्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली.

Web Title: In the Gondavalekar Maharaja's Samadhi, on the occasion of flowering, 10-day celebrations,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.