सातारा : गोडवाडीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 06:01 PM2018-12-18T18:01:09+5:302018-12-18T18:03:36+5:30

बक्षीसपत्राची नोंद करून सातबारा आणि फेरफार उतारा देण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना गोडवाडी (उंब्रज) ता. कऱ्हाड येथील तलाठी राजेंद्र निवास मोहिते (वय ४८, मूळ रा. मनव, ता. कऱ्हाड , सध्या रा. कार्वे नाका, कऱ्हाड ) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

Godavadi Talathi's in the trap of bribery | सातारा : गोडवाडीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

सातारा : गोडवाडीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देगोडवाडीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यातबक्षीसपत्राच्या नोंदीसाठी पैसे : उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा

उंब्रज : बक्षीसपत्राची नोंद करून सातबारा आणि फेरफार उतारा देण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना गोडवाडी (उंब्रज) ता. कऱ्हाड येथील तलाठी राजेंद्र निवास मोहिते (वय ४८, मूळ रा. मनव, ता. कऱ्हाड , सध्या रा. कार्वे नाका, कऱ्हाड ) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित तक्रारदाराला बक्षीसपत्राची नोंद करून तसा सातबारा आणि फेरफार हवा होता. त्यासाठी तक्रारदार मौजे गोडवाडी, ता. कऱ्हाड सजा उंब्रज येथील कार्यायात गेले.

या ठिकाणी तलाठी राजेंद्र मोहिते याने तक्रारदाराकडे बक्षीसपात्राची नोंद करून घेण्यासाठी दोन हजारांची मागणी केली. अखेर तडजोडीनंतर दीड हजार रुपये घेण्याचे मोहिते याने मान्य केले.

त्यानंतर संबंधित तक्रारदाराने याबाबतची रितसर तक्रार लाचलुचतपच्या अधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार सोमवारी दुपारी उंब्रज येथील मंडलाधिकाऱ्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांनी सापळा लावला.

यावेळी राजेंद्र मोहिते याला दीड हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला सातारा येथील लाचलुचपतच्या कार्यालयात आणण्यात आले. त्याच्याकडे अधिकारी कसून चौकशी करत आहेत. उंब्रज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत मोहितेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Godavadi Talathi's in the trap of bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.