फोरजी सेवा फक्त कागदावरच, खंडित सेवेमुळे ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:57 PM2019-03-08T12:57:57+5:302019-03-08T12:59:30+5:30

औंधसह परिसरात खासगी मोबाईल कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना कॉलिंग करताना तसेच इंटरनेट सेवा वापरताना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

 Furious service only on paper, the customer loses the service | फोरजी सेवा फक्त कागदावरच, खंडित सेवेमुळे ग्राहक त्रस्त

फोरजी सेवा फक्त कागदावरच, खंडित सेवेमुळे ग्राहक त्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्दे फोरजी सेवा फक्त कागदावरच, खंडित सेवेमुळे ग्राहक त्रस्तऔंध परिसरात खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचे तीन तेरा

औंध : औंधसह परिसरात खासगी मोबाईल कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना कॉलिंग करताना तसेच इंटरनेट सेवा वापरताना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ग्राहकांना विविध प्रकारच्या योजनांची प्रलोभने दाखवून आपल्याकडे ग्राहक वर्ग खेचण्यासाठी मोबाईल कंपन्या प्रयत्न करत आहेत. मात्र सेवेच्या नावाने शिमगा सुरू असल्याने मोबाईल ग्राहक, पर्यटक, भाविक, विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कंपन्यांनी मोबाईल सेवेत तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी केली जात आहे.

औंधसह परिसरातील सुमारे पंधरा गावांचा औंधशी नियमित संबंध येतो. त्यामुळे औंध परिसरात मोठा मोबाईल ग्राहक वर्ग आहे. सुमारे बारा ते पंधरा हजार खासगी मोबाईल ग्राहकांची संख्या याठिकाणी आहे.

त्याचबरोबर नियमित येणारे भाविक, पर्यटक यांची ही मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे; पण खासगी कंपन्यांकडून नियमित म्हणावी तशी सेवा दिली जात नाही. ग्राहकांना आॅफर एक अन् सेवा वेगळ्याच दर्जाची दिली जात आहे.

फोर जी सेवा तर फक्त कागदावरच आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून मागणी करूनही फक्त आश्वासनांच्या पलीकडे ग्राहकांच्या हाती काहीच लागत नाही.

Web Title:  Furious service only on paper, the customer loses the service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.