वडूज येथील पोलिस ठाण्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 3:07pm

 वडूज, ता. खटाव येथील पोलिस ठाण्यासमोरच बजरंग गुडाप्पा पुजारी (वय ३७, रा. वडूज ता. खटाव) याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी पुजारीवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

सातारा  ,दि. १० :  वडूज, ता. खटाव येथील पोलिस ठाण्यासमोरच बजरंग गुडाप्पा पुजारी (वय ३७, रा. वडूज ता. खटाव) याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी पुजारीवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बजरंग पुजारी हा अचानक वडूज पोलिस ठाण्यासमोर असलेल्या एका झाडावर चढला. यावेळी तहसील आणि पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ होती. तो झाडावर चढल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. तोपर्यंत बजरंगने दोरीच्या साह्याने गळफास घेतला.

या प्रकारानंतर तेथे असलेल्या काही पोलिस आणि नागरिकांनी झाडावर चढून तत्काळ बजरंगच्या गळ्याभोवतीचा फास काढला. त्यानंतर त्याला झाडावरून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आदल्या रात्री बजरंगची कोणासोबत तरी वादावादी झाली होती. यातूनच त्याने हा प्रकार केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

संबंधित

कारच्या काचा फोडल्या; इसमावर गुन्हा दाखल
नशेत पोटात सुरी मारून घेतल्याने इसमाचा मृत्यू
रस्ता लुटीप्रकरणी चौघांना अटक
सांगली, मिरजेत ८६ सीसीटीव्ही कॅमेरे! सुहेल शर्मा , १ मे रोजी कार्यान्वित
निंबोल येथील जुगार अड्ड्यावरील धाडीत ७० लाखांचा ऐवज जप्त

सातारा कडून आणखी

निमसोडच्या जलक्रांतीचे आम्ही होणार साक्षीदार--चला गाव बदलूया
गावाकडच्या चटणीचा काय वर्णावा थाट! महानगरांमधून वाढतेय मागणी
प्रथमच एक कोटी क्विंटल साखर उत्पादन- सातारा जिल्ह्यातील विक्रमी गाळप
सातारा : खासगी बसमधून प्रवाशाची बॅग चोरली, चालक, वाहकावर पोलिसांत गुन्हा नोंद
सातारा : खटावमध्ये लॉन्ड्री व स्टेशनरी दुकानाला आग

आणखी वाचा