वडूज येथील पोलिस ठाण्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 03:07 PM2017-11-10T15:07:33+5:302017-11-10T15:17:27+5:30

 वडूज, ता. खटाव येथील पोलिस ठाण्यासमोरच बजरंग गुडाप्पा पुजारी (वय ३७, रा. वडूज ता. खटाव) याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी पुजारीवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

In front of the police station of Vaduz, attempt to commit suicide by hanging in front of the police station | वडूज येथील पोलिस ठाण्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

वडूज येथील पोलिस ठाण्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देवडूज येथील प्रकाराने खळबळवादावादीतून आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, अशी पोलिसांची शक्यताजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

सातारा  ,दि. १० :  वडूज, ता. खटाव येथील पोलिस ठाण्यासमोरच बजरंग गुडाप्पा पुजारी (वय ३७, रा. वडूज ता. खटाव) याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी पुजारीवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.


याबाबत अधिक माहिती अशी की, बजरंग पुजारी हा अचानक वडूज पोलिस ठाण्यासमोर असलेल्या एका झाडावर चढला. यावेळी तहसील आणि पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ होती. तो झाडावर चढल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. तोपर्यंत बजरंगने दोरीच्या साह्याने गळफास घेतला.

या प्रकारानंतर तेथे असलेल्या काही पोलिस आणि नागरिकांनी झाडावर चढून तत्काळ बजरंगच्या गळ्याभोवतीचा फास काढला. त्यानंतर त्याला झाडावरून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आदल्या रात्री बजरंगची कोणासोबत तरी वादावादी झाली होती. यातूनच त्याने हा प्रकार केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: In front of the police station of Vaduz, attempt to commit suicide by hanging in front of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.