मध्यप्रदेशातील महाराजांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू चार शिष्य जखमी : खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे टॅँकरला ओव्हरटेक करताना कार पलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:48 PM2018-01-19T22:48:02+5:302018-01-19T22:49:12+5:30

वडूज : खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टँकरला ओव्हरटेक करत असताना कार चालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी झाली.

Four pilgrims injured in road accident in Maharaj, Madhya Pradesh: A car overtakes a tanker at Dhondewadi in Khatav taluka | मध्यप्रदेशातील महाराजांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू चार शिष्य जखमी : खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे टॅँकरला ओव्हरटेक करताना कार पलटली

मध्यप्रदेशातील महाराजांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू चार शिष्य जखमी : खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे टॅँकरला ओव्हरटेक करताना कार पलटली

Next

वडूज : खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टँकरला ओव्हरटेक करत असताना कार चालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी झाली. यात मध्यप्रदेशामधील श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे श्रीराम महाराज रामदासी (मूळ रा. गोंदवले, ता. माण) यांचा मृत्यू झाला.याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेशला जाण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारमधून (एमएच १३ सीयू १३१३) ते निघाले होते.

दरम्यान, धोंडेवाडी येथे नवीन महावितरण उपकेंद्रानजीक टँकरला ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी झाली. या अपघातात कारमधील त्यांचे चार शिष्यही जखमी झाले. श्रीराम महाराज रामदासी यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव मध्यप्रदेशमधील बडवाह या गावी नेण्यात आले. खेडीघाटमध्ये श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे ते संस्थापक होते. त्यांचे मध्यप्रदेश व देशभरात अनेक ठिकाणी भक्त आहेत. त्यांचे मूळगाव गोंदवले, ता. माण आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. अधिक तपासासाठी वडूज पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Four pilgrims injured in road accident in Maharaj, Madhya Pradesh: A car overtakes a tanker at Dhondewadi in Khatav taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.