चारचाकी-दुचाकी अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 04:26 PM2019-05-07T16:26:07+5:302019-05-07T16:27:21+5:30

तांबवेजवळील पवारमळा परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. तर दोन मुली जखमी झाल्या.

Four killed in a four-wheeler accident | चारचाकी-दुचाकी अपघातात युवक ठार

चारचाकी-दुचाकी अपघातात युवक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देचारचाकी-दुचाकी अपघातात युवक ठारतांबवे-पवारमळा येथील घटना : दोन मुली जखमी

तांबवे : तांबवेजवळील पवारमळा परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. तर दोन मुली जखमी झाल्या.

प्रतीक शंकर शिंदे (वय १९, रा. वसंतगड, ता. कऱ्हाड ) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर प्रतीक्षा शंकर शिंदे (वय १४, रा. वसंगतड, ता. कऱ्हाड ) व गुड्डी चंद्रकांत चव्हाण (वय १०, रा. वारुंजी, ता. कऱ्हाड ) या दोघी जखमी झाल्या. यातील प्रतीक्षा शिंदे ही गंभीर जखमी झाल्याने तिला कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गुड्डी शिंदे ही किरकोळ जखमी झाली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चालक सूरज कृष्णात गुरव हे आपली पिकअप गाडी (एमएच ०४ ई ९४३८) ही घेऊन तांबवेमार्गे घारेवाडीच्या दिशेने निघाले होते. यादरम्यान, ते तांबवे पुलाजवळील पवारमळा येथे आले असता रस्त्यावर समोरून दुचाकी (एमएच ११ टीके २५) यावरून प्रतीक, प्रतीक्षा व गुड्डी हे तांबवेहून वसंतगडच्या दिशेने निघाले होते.

पवारमळा येथे ते आले असता रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून येणारी पिकअप गाडी न दिसल्याने त्याला समोर धडक बसली. यामध्ये प्रतीक शिंदे हा जागीच ठार झाला. याबाबतची माहिती तांबवे पोलीस पाटील पवन गुरव यांनी दिली. अपघात घडताच त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: Four killed in a four-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.