सातारा हद्दवाढीबाबत होकार-नकाराची घंटा!--सूर जुळेना :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:13 AM2017-09-28T00:13:10+5:302017-09-28T00:15:55+5:30

सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत सातारा शहर व शहरालगतच्या ग्रामीण भागांचे नेतृत्व करणाºया नेतेमंडळींत एकवाक्यता नाही. विशेष म्हणजे हद्दवाढीला विरोध करणारे बहुतांश नेते

Due to the growing horizons of Satara! - Sur twist: | सातारा हद्दवाढीबाबत होकार-नकाराची घंटा!--सूर जुळेना :

सातारा हद्दवाढीबाबत होकार-नकाराची घंटा!--सूर जुळेना :

Next
ठळक मुद्देस्थानिक जनतेचे म्हणणे जाणून घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत सातारा शहर व शहरालगतच्या ग्रामीण भागांचे नेतृत्व करणाºया नेतेमंडळींत एकवाक्यता नाही. विशेष म्हणजे हद्दवाढीला विरोध करणारे बहुतांश नेते हे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे आहेत. हद्दवाढीसाठी पालिका आग्रही आहे, तर हद्दवाढ नको म्हणून पंचायत समितीमधील सत्ताधारी आणि विरोधकही ठाम आहेत. या परिस्थितीत स्थानिक जनतेचे म्हणणे जाणून घेणे गरजेचे बनले आहे.

राज्य शासनाने बुधवार, दि. २२ मार्च २०१७ रोजी सातारा शहराच्या हद्दवाढीची प्रारंभी अधिसूचना काढली आहे. ३० दिवसांत हद्दवाढीविषयी नागरिकांच्या हरकती घेण्यात येणार होत्या. मात्र, आता पंचायत समितीच्या सत्ताधारी व विरोधकांनीही एकमत करत हद्दवाढीत येण्यास विरोध दर्शविला असून, शाहूपुरी व खेड-विलासपूर या स्वतंत्र नगरपंचायतींची मागणी केली आहे.

सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या ३५ वर्षांपासून लोंबकळत पडला आहे. शहराचं एकूण क्षेत्रफळ ८.६१ चौरस किलोमीटर इतके आहे. शहरातील रस्ते, बाजारपेठा, भाजी मंडई, कचरा डेपो यांची सोय सातारा पालिकेने केली असली तरी सध्याच्या घडीला या सर्व सोयींचा उपभोग हद्दीबाहेरील नागरिकच मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.

शहराच्या विद्यमान हद्दीच्या बाजूने होणारा विकास व त्या अनुषंगाने लगतच्या परिसरातील वाढणारी लोकसंख्या व या वाढीव लोकसंख्येचा शहरातील सार्वजनिक सेवा सुविधांवर पडणारा वाढता ताण लक्षात घेता शहराची हद्दवाढ करणे अपरिहार्य आहे, असा प्रस्ताव सातारा पालिकेने नगरविकास विभागाला सादर केला होता.

या हद्दवाढीमध्ये करंजे व गोडोलीचा सध्या नगरपालिका क्षेत्रातील असणाºया भागाव्यतिरिक्त उर्वरित परिसर, दरे खुर्द (यवतेश्वर पायथा), शाहूपुरी, अजिंक्यतारा किल्ला, राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील खेड, कोडोली या गावांचा परिसर या हद्दवाढीच्या प्रस्तावात घेण्यात आला आहे.
हद्दवाढ झाल्यास भरसाठ कर वाढतील, अशी धास्ती अनेकजणांना लागली आहे. तसेच बांधकाम करताना पालिकेच्या जाचक अटीही असल्यामुळे अनेकजण सातारा पालिकेच्या हद्दीत येण्यास इच्छूक नाहीत. ग्रामपंचायतीमध्येच आपण राहावे, असे अनेकजणांना वाटते.

शहराची हद्दवाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. शहराच्या लगत ग्रामपंचायतींच्या तसेच त्रिशंकू भागात राहणाºया नागरिकांचे दैनंदिन व्यवहार हे शहराशी निगडित आहेत. लगतच्या ग्रामपंचायतीची हद्द शहरात समाविष्ट झाल्यास मोठ्या योजनाही राबवता येतील. शासनाकडून निधीही वाढून मिळेल. हद्दवाढीनंतर कर वाढेल, ही भीती अनाठायी आहे.
- माधवी कदम, नगराध्यक्षा.

शहराचे क्षेत्रफळही वाढणार
सातारा शहराची सध्याची लोकसंख्या १ लाख २० हजार
हद्दवाढीनंतर वाढणारी लोकसंख्या १ लाख ९८ हजार
हद्दवाढीनंतर शहराचे होणारे एकूण क्षेत्रफळ १८ चौरस किलोमीटर

Web Title: Due to the growing horizons of Satara! - Sur twist:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.