पाटण तालुक्यातील दवाखाने औषधाविना , रुग्णांच्या आरोग्याशी खेळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:53 PM2018-08-17T23:53:45+5:302018-08-17T23:55:18+5:30

चाफळ : पाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयातही औषधांचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे रुग्णांना ताप, थंडीची औषधेही बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. विशेष म्हणजे औषधांचा पुरवठा करण्याचे कंत्राट एका संस्थेला देण्यात आले

Drug dispensaries in Patan taluka, game of patients with health ... | पाटण तालुक्यातील दवाखाने औषधाविना , रुग्णांच्या आरोग्याशी खेळ...

पाटण तालुक्यातील दवाखाने औषधाविना , रुग्णांच्या आरोग्याशी खेळ...

Next
ठळक मुद्देहजारो रुग्णांची गैरसोय : प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयात तुटवडा

चाफळ : पाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयातही औषधांचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे रुग्णांना ताप, थंडीची औषधेही बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. विशेष म्हणजे औषधांचा पुरवठा करण्याचे कंत्राट एका संस्थेला देण्यात आले आहे. परंतु ही संस्थाच गत सहा महिन्यांपासून औषधांचा पुरवठा करत नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळे शासनच ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

शासनाने ग्रामीण भागातील ग्रामस्थांना गाव व परिसरात उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालये सुरू केली आहेत. या दवाखान्यातील भौतिक सोयीसुविधांना बळ देण्याचे कामही शासन स्तरावर करण्यात आले आहे. शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम व योजनाही राबवण्यात येत आहेत. मात्र औषधे पुरवणारी संस्था व शासनाच्या उदासीन कारभारामुळे पाटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

पाटण तालुक्यात एकूण १३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६३ उपकेंद्र व २ ग्रामीण रुग्णालये आहेत. एकीकडे तालुक्याच्या या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची वानवा असल्यामुळे रुग्णांना औषधे देता येईनात. तर दुसरीकडे बºयाचशा उपकेंद्रांना कर्मचारी नसल्याने ती ओस पडू लागली आहेत. तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांतून गत दोन महिन्यांपासून मागणीच्या प्रमाणात औषध पुरवठा करणे दूरच एक दिवस पुरेल एवढीही औषधे देता येत नसल्याने अधिकाºयांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत.

सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने डासांची उत्पत्ती वाढून त्यापासून उद्भवणाºया आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आरोग्य केंद्रांना औषधे मिळत नसल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडत आहे. एकंदरीतच ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता औषधांच्या तुटवड्यामुळे पूर्णपणे हतबल झाली असून, शासनाने औषध पुरवठा करून रुग्णांची होणारी परवड थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कंपनीला जाब विचारणार कोण?
औषध व साहित्य खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय गतवर्षी जुलै महिन्यात मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार एका कंपनीवर औषधै पुरवण्याची जबाबदारी दिली गेली आहे. परंतु आता वर्ष पूर्ण होऊनसुद्धा संबंधित कंपनीकडून औषध व साहित्याचा पुरवठा केला गेला नाही. एकंदरीतच रुग्णांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून, संबंधित कंपनीला कोण जाब विचारणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
 

रुग्णालयांमध्ये वादावादीचे प्रकार
पाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयात सर्दी, खोकला, तापाचे औषधही रुग्णांना मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे केवळ रुग्णांची तपासणी करून त्यांना बाहेरुन औषधे घेण्यास सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
 

 

पाटण तालुक्यात गत दोन ते तीन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा जाणवत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला कळवले होते. जिल्हा प्रशासनानेही तातडीने औषध खरेदीसाठी तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास दहा हजार रुपये दिले आहेत. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत यातून खरेदी केलेली औषधे अपुरी पडत आहेत. शासनाने एका संस्थेला औषध पुरवठा करण्याचे कंत्राट दिले आहे. परंतु या संस्थेकडूनच जिल्हा प्रशासनास औषधे पुरवली नसल्याने सर्वत्रच औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
- डॉ. दीपक साळुंखे
तालुका वैद्यकीय अधिकारी, पाटण


 

 

Web Title: Drug dispensaries in Patan taluka, game of patients with health ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.