कोयनेचे दरवाजे अडीच फुटापर्यंत उघडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 03:07 PM2017-09-21T15:07:44+5:302017-09-21T15:11:13+5:30

The doors of the koyani opened up to two and a half feet | कोयनेचे दरवाजे अडीच फुटापर्यंत उघडले 

कोयनेचे दरवाजे अडीच फुटापर्यंत उघडले 

Next
ठळक मुद्देनदीपात्रात २५ हजार ४५१ क्यसुेक पाण्याचा विसर्ग सुरू जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूधरण दरवाजा आणि पायथा वीजगृह असे दोन्ही ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग

सातारा : कोयना धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने गुरूवारी दुपारी १२ च्या सुमारास दरवाजे अडीच फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरण दरवाजा आणि पायथा वीजगृह असे दोन्ही ठिकाणाहून २५ हजार ४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे.


जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात सुमारे २५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. बुधवारपेक्षा गुरूवारी धरणातील साठा वाढला असून तो १०५ टीएमसी इतका झाला आहे.

बुधवारपासून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे दोन फुटावरुन अडीच फुटापर्यंत वरती नेण्यात आले आहेत. सध्या दरवाजातून २३ हजार ३५१ आणि पायथा वीजगृहातून २१०० असा २५ हजार ४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
 

Web Title: The doors of the koyani opened up to two and a half feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.