फडणवीस सरकारला शेतकºयांचे घेणे ना देणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:53 PM2018-01-14T23:53:04+5:302018-01-14T23:53:12+5:30

Do not give Fadnavis government the help of farmers | फडणवीस सरकारला शेतकºयांचे घेणे ना देणे

फडणवीस सरकारला शेतकºयांचे घेणे ना देणे

Next


शिरवळ : ‘शेतकºयांबाबतीत सरकारची भूमिका दुटप्पीपणाची आहे. शेतकºयांनी आधुनिकतेची कास धरली असली तरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हमीभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सरकारने कर्जमाफीबाबत शेतकºयांच्या भावनेशी खेळल्याने मंत्र्यांनाच सरकारवर भरवसा राहिला नाही,’ अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
शिरवळ येथील राज्यस्तरीय कृषी व पशुप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, माजी सभापती नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा बँकेचे संचालक दत्ता ढमाळ, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे, खंडाळा पंचायत समिती सभापती मकरंद मोटे, उपसरपंच दिलीप गुंजवटे, मोहन भरगुडे, वैभव भरगुडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धेश्वर राऊत, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अजय भोसले, शिदेंवाडीचे सरपंच निवृत्ती जाधव, संदीप गोळे, व्यवस्थापक रणजित पांडे उपस्थित होते.
नितीन भरगुडे-पाटील यांनी प्रास्ताविकात सत्कारमूर्तींची मोठी यादी झाल्याने अजित पवार यांनी हसत जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या पराभवामुळे नितीन भरगुडे-पाटील यांचा जोरदार चिमटा काढला. ‘यावेळी नितीन नुसते लोकांचे सत्कार नको करत बसू. लोक तुला पाडतात,’ असे अजित पवार म्हणताच कार्यक्रमस्थळी हशा पिकला. यावेळी नितीन भरगुडे-पाटील यांनाही हसू आवरता आले नाही.
यावेळी आमदार मकरंद पाटील, नितीन भरगुडे, उदय कबुले, मनोज पवार यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप गोळे यांनी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Do not give Fadnavis government the help of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.