डिजिटल सातबारा; कऱ्हाडात तीन-तेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 10:30 PM2018-06-08T22:30:32+5:302018-06-08T22:30:32+5:30

Digital Satara; Karhadat three-eleven! | डिजिटल सातबारा; कऱ्हाडात तीन-तेरा!

डिजिटल सातबारा; कऱ्हाडात तीन-तेरा!

Next
ठळक मुद्देवारंवार ‘सर्व्हर डाऊन’ : शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू;दाखला मिळत नसल्याने शेतकरी हैराणउताऱ्याअभावी कामे खोळंबली

संतोष गुरव।
कऱ्हाड : १ जूनपासून शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा उतारा मिळणार, अशी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली. त्यानुसार तो देण्यास सुरुवातही केली गेली. मात्र, सध्या आॅनलाईन सातबारा दाखला काढण्यासाठी गेल्यास सातबारा संगणकीकरणाच्या कामात अधूनमधून सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना तो मिळेनासा झाला आहे.

डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल खात्याने राज्यातील सर्व गावांमधील शेतकºयांच्या जमिनीचे सातबारा उतारे आॅनलाईन उपलब्ध करून देण्याचे गेल्या वर्षी जाहीर केले होते. २०१७ मधील स्वातंत्र्य दिनापर्यंत राज्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे आॅनलाईन होणे अपेक्षित होते. त्यावेळी या कामात प्रशासन अपयशी ठरले होते. त्यानंतर एक मे २०१८ रोजी आॅनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्यानुसार ३१ मेपर्यंत सातबारा दाखल डिजिटल स्वाक्षरीसह आॅनलाईन दिसू लागेल खरे.

मात्र, ते काढण्यासाठी गेल्यास सातबारा संगणकीकरणाचे सर्व्हर डाऊन आणि रि-एडिटचे काम अपूर्ण असल्यामुळे नावावर असूनही दाखला शेतकºयांना काढता येणे मुश्कील बनले. शेतकºयांची गैरसोय दूर करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. तसेच गुरुवारपासून अधिकृतपणे डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा मिळण्यास सुरुवात झाली असल्याचे अधिकाºयांतून सांगितले जात असले तरी दाखला काढण्यासाठी शेतकरी गेल्यास त्यास तो मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांतून प्रशासनाच्या या कामाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

सध्या शेतीतील कामे सुरू असल्याने शासनाच्या कृषी विभागाकडून विविध योजनांचा लाभ देण्याची शेतकºयांकडून मागणी केली जात आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयात गेल्यास त्यांना इतर कागदपत्रांसह सातबाराचीही मागणी केली जात आहे. मात्र, संगणकीकरणाच्या कामात सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा मिळणे मुश्कील बनले आहे. परिणामी त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

सर्व्हर डाऊन आहे थोडावेळ थांबा !
ग्रामीण भागात तलाठी कार्यालये, तहसील कार्यालय, तालुक्यातील महा ई सेवाकेंद्र, सेतू कार्यालय आदी ठिकाणी शेतकरी डिजिटल सातबारा काढण्यासाठी गेल्यास शासनाचा सर्व्हर डाऊन दाखवत आहे. दाखले घेण्यासाठी थोडा वेळ थांबा, सर्व्हर डाऊन आहे. सुरू झाल्यास दाखला मिळेल, असे शेतकºयांना संबंधित कर्मचाºयांकडून सांगितले जात आहे.
 

अथक परिश्रमानंतर नोंदीमध्ये चुका !
शेतीसाठी सातबारा उतारा हा महत्त्वाचा मानला जातो. कारण त्यावर सर्व शेतकरी कुटुंबातील वारस, पीकपाणी, जमीन क्षेत्र आदींची परिपूर्ण अधिकृत नोंद असते. मात्र, शासनाने शेतकºयांना डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा हाती देण्याचा निर्णय चांगला घेतला. परंतु त्याची अंमलबजावणी योग्य करण्यात शासनाला अपयश आल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे सध्या निघणाºया डिजिटल सातबारावर चुकीचे नाव, चुकीचे जमीनक्षेत्र याची नोंद दिसत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
 

शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा मिळावा म्हणून शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या प्रशासनातील तलाठी यांच्याकडे असलेल्या वेबसाईटवर डिजिटल सातबारा मिळत आहे. सध्या डिजिटल सातबारा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
- हिम्मत खराडे, प्रांताधिकारी, कºहाड

Web Title: Digital Satara; Karhadat three-eleven!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.