दुष्काळी गावात भरली ‘धमाल शाळा’ : पाणी फाउंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:11 AM2019-01-10T00:11:05+5:302019-01-10T00:12:26+5:30

माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावातील शाळांमध्ये संगीत खुर्ची, सापशिडी,

 'Dhamal school' filled with drought-hit villages: Water Foundation's initiative | दुष्काळी गावात भरली ‘धमाल शाळा’ : पाणी फाउंडेशनचा उपक्रम

वडी (ता. खटाव) येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या धमाल शाळेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्यासाठी खेळाद्वारे जनजागृती

सातारा : माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावातील शाळांमध्ये संगीत खुर्ची, सापशिडी, गोष्टी, खेळ, गाण्यांची धमाल शाळा भरली आहे. या शाळेतून विद्यार्थ्यांना जलसंधारण आणि पाणी बचतीचे महत्त्व सांगून त्यांचे मनसंधारणाचे काम सुरू आहे.

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी २०१६ पासून पाणी फाउंडेशनची वॉटर कप ही एक लोकचळवळ म्हणून उभी आहे. ‘माथा ते पायथा’ या नियमास धरून लोकसहभागातून पाणी फाउंडेशन गावागावापर्यंत पोहोचले आहे. या चळवळीमधून अनेक गावे पाणीदार झाली. यावर्षी पाणी फाउंडेशनचे चौथे पर्व आहे. या चळवळीत लहान मुलांचा सहभाग वाढविण्यासाठी निसर्गाची धमाल शाळा, चला पर्यावरणाच्या या पुस्तकात डोकावून पाहू... या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

पानी फाउंडेशनतर्फे निसर्गाची धमाल शाळा या पायलट प्रोजेक्टमध्ये सातारा जिल्ह्यातील माण, खटाव व कोरेगाव या तीन दुष्काळी तालुक्यांचा समावेश करण्यात आला. ३६ गावांची निवड करण्यात आली. इयत्ता आठवी ते नववीमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, पाणी बचत वृक्षसंवर्धन याचे प्रशिक्षण दिले. संगीत खुर्ची, सापशिडी, गोष्टी, खेळ, गाण्यांद्वारे निसर्ग आणि पाण्याचे महत्त्व सांगून आजोबांच्या काळात ओढ्यात पाणी होते. सध्या काळात बाटलीमध्ये पाणी दिसायला लागले असून पुढल्या काळात कॅप्सूलमध्ये पाणी दिसेल, हे पाण्याचे वास्तव मांडले जाते.

ही परिस्थिती ओढवू नये म्हणून तुम्हाला हातात टिकाव, फावडे घेऊन श्रमदानाच्या चळवळीतून आपलं गाव पाणीदार करावं लागंल, असे आवाहन केले जाते. आदर्श गावचे पाणलोट उपचार असणारे मॉडेल बनवण्यास शिकवले जाते. विद्यार्थीही आवडीने अशा प्रकारे स्वत: मॉडेल तयार करतात. त्यातून तीन शाळांचे नंबर काढण्यात येतात. शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येते. या धमाल शाळांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
 

लहान मुले म्हणजे फुले या युक्तीप्रमाणे पाणी फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या कौशल्यासाठी आणि पाण्याचे महत्त्व मनामनात रुजवून जलसंधारणाकडून मनसंधारणाकडे प्रवास सुरू झालेला आहे. पर्यावरण, पाणी आणि जलसंधारणावर खेळातून प्रबोधन केले जात आहे.
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा समन्वयक, पाणी फाउंडेशन

 

Web Title:  'Dhamal school' filled with drought-hit villages: Water Foundation's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.