निवृत्त पोलीस उपअधीक्षकाला साडेचार कोटींना लुटले-कऱ्हाडातून अपहरण-उंब्रजजवळ टाकले -संशयित सापडले कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 07:07 PM2018-06-19T19:07:34+5:302018-06-19T19:48:53+5:30

The deputy superintendent of police retrieved Rs 4.5 crore from the robbery and kidnapping and kidnapping. | निवृत्त पोलीस उपअधीक्षकाला साडेचार कोटींना लुटले-कऱ्हाडातून अपहरण-उंब्रजजवळ टाकले -संशयित सापडले कोकणात

निवृत्त पोलीस उपअधीक्षकाला साडेचार कोटींना लुटले-कऱ्हाडातून अपहरण-उंब्रजजवळ टाकले -संशयित सापडले कोकणात

Next

कऱ्हाड (सातारा) :कऱ्हाड  शहरातील एका हॉटेलमधून निवृत्त पोलीस उपअधीक्षकासह दोघांचे अपहरण करुन त्यांच्याकडील सुमारे साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या लुटीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकारी तातडीने कऱ्हाडात दाखल झाले. दरम्यान, या मोठया घटनेतील तीन संशयित रत्नागिरी जिल्हयातील
 संगमेश्वर पोलिसांच्या जाळयात सापडले  आहेत. पोलिसांनी लावलेलंय साफल्यात ते संशयित यशस्वीरीत्या सापडले असून पुढील तपास वेगाने सुरु आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील इंडी परिसरातील काही प्रतिष्ठित मंडळी कऱ्हाडजवळील हायवेवरच्या हॉटेलमध्ये उतरली होती. एका कारखान्याचा एक मोठा व्यवहार करण्यासाठी ही मंडळी आली होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकी देऊन एका कारमध्ये बसविले. त्यांच्यासोबत इनोव्हा अन् स्कार्पिओ याही गाड्या होत्या.

कऱ्हाड-उंब्रज दरम्यान या मंडळींकडे असलेली साडेचार कोटींची रोख रक्कम हिसकावून घेऊन यांना उंब्रजजवळ गाडीतून बाहेर फेकून देण्यात आले. त्यानंतर या गाड्या पुन्हा सुसाट कऱ्हाडकडे धावल्या. स्वत:चा जीव वाचवून ही मंडळी कशीबशी कऱ्हाड पोलीस ठाण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांच्या तपासाची चक्रे जोरदार फिरली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह इतर पोलीस अधिकारी कऱ्हाड तत्काळ दाखल झाले.
तासवडे अन् किणी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मागविले असून या गाड्यांचा शोध लागल्यानंतरच पोलिसांच्या हाती संशयित लागू शकतील. अवघ्यां काही तासातच पोलिसांनी तपासाची
चक्रे वेगाने फिरवीत या मोठया चोरीच्या आव्हानाला सामोरे जात संशयितांचं मुसक्या आवळल्या

Web Title: The deputy superintendent of police retrieved Rs 4.5 crore from the robbery and kidnapping and kidnapping.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.