डेंग्यूच्या धास्तीने आरोग्य पथक रात्रभर तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 02:15 PM2017-10-28T14:15:03+5:302017-10-28T14:18:49+5:30

सातारा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगलमूर्ती विहार सोसायटीमध्ये डेंग्यूचे आठ रुग्ण आढळल्याने प्राथमिक आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून, शनिवारी रात्रभर या उपनगरामध्ये हे पथक तळ ठोकून होते.

Danger to dengue, keep the campscapes all night round | डेंग्यूच्या धास्तीने आरोग्य पथक रात्रभर तळ ठोकून

डेंग्यूच्या धास्तीने आरोग्य पथक रात्रभर तळ ठोकून

googlenewsNext
ठळक मुद्देघरा-घरात जाऊन आरोग्य पथकाने नागरिकांची तपासणी प्राथमिक आरोग्य विभाग खडबडून झाले जागे

सातारा , दि. २८ : शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगलमूर्ती विहार सोसायटीमध्ये डेंग्यूचे आठ रुग्ण आढळल्याने प्राथमिक आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून, शनिवारी रात्रभर या उपनगरामध्ये हे पथक तळ ठोकून होते.


शुक्रवारी सायंकाळी प्रत्येक घरा-घरात जाऊन आरोग्य पथकाने नागरिकांची तपासणी केली. जे कोणी आजारी असतील त्यांच्या रक्ताचे नमनुे तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच सोसायटीमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाचे अधिकारीही रात्री घरी गेले नाहीत.

गटारे आणि हॉटेलमधील साठवून ठेवलेले पाणी कर्मचाऱ्यांनी स्वच्छ करण्यास सांगितले. दरम्यान, शनिवारी सकाळपासून पुन्हा फॉगिंग मशीनद्वारे औषध फवारणी करण्यात येत होती.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू असून, ही डेंग्यूची साथ आटोक्यात येत असल्याचे प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Danger to dengue, keep the campscapes all night round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.