होस्टेलमध्ये कट; विकत घेतला कोयता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:05 PM2017-11-19T23:05:18+5:302017-11-19T23:25:54+5:30

Cut in the hostel; Bought! | होस्टेलमध्ये कट; विकत घेतला कोयता!

होस्टेलमध्ये कट; विकत घेतला कोयता!

Next


कºहाड : प्रथमेशसोबत कधीही थेट वाद नव्हता; पण तरीही चिन्मयला त्याचा काटा काढायचा होता. त्यासाठी त्याने साथीदार जमवले. त्या साथीदारांनाही प्रथमेशशी काही देणेघेणे नव्हते. मात्र, चिन्मयसाठी ते सहभागी झाले. होस्टेलच्या खोलीत त्यांचा कट शिजला. खुनासाठी कºहाडातून चक्क चाकू आणि कोयताही खरेदी केला. आणि अकरावी, बारावीतील या मुलांनी सराईतासारखा खून केला.
पार्ले येथे खून झालेल्या प्रथमेश संकपाळ या युवकाच्या खून प्रकरणात चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडगाव हवेलीतील चिन्मय जगताप हा या खून प्रकरणाचा ‘ब्रेन’ असल्याचे पोलिस सांगतायत. मात्र, प्रथमेश आणि चिन्मयचा कधीही थेट वाद झाला नव्हता. तसेच अन्य संशयितांचेही प्रथमेशशी वैरत्व नव्हते; पण तरीही त्यांनी प्रथमेशला संपवले. या खून प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना प्रथम प्रेम प्रकरणाचा संशय होता. त्यादृष्टीने त्यांनी तपासही केला. मात्र, खरे कारण समोर आल्यानंतर पोलिसही अवाक झाले.
प्रथमेशचा वहागावमध्ये मित्र आहे. तर चैतन्यचा एक नातेवाईक युवक तारूखमध्ये राहतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत तारूखमध्ये चिन्मयच्या नातेवाईक युवकाने प्रथमेशच्या वहागावमधील मित्राला मारहाण केली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रथमेशसह त्याच्या मित्रांनी चैतन्यच्या त्या नातेवाईक युवकाला मारहाण केली.
हा एकमेकाला मारहाणीचा प्रकार नंतर तीन ते चारवेळा झाला. त्यामुळेच प्रथमेश व चैतन्यमध्ये खुन्नस निर्माण झाली. चैतन्यच्या नातेवाईक युवकाला मारहाण केल्यामुळे वहागावमधील युवक काही दिवस भीतीच्या छायेखाली होता. त्यावेळी प्रथमेशने चैतन्यसह त्याच्या मित्रांना दमबाजी केली होती, असे पोलिसांनी सांगितले.
आपल्या गटाला प्रथमेश नडत असल्याचे समजल्यानंतर चैतन्यची त्याच्याविषयीची खुन्नस आणखीनच वाढली. त्यातूनच त्याने त्याचा खून करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी होस्टेलच्या खोलीत चैतन्य, त्याचा मित्र विजय व अन्य दोघांनी बैठक घेतली. १४ आणि १६ नोव्हेंबर अशा दोनवेळा त्यांनी त्यासाठी बैठका घेतल्या. १६ नोव्हेंबरला त्यांनी प्रथमेशला कसे संपवायचे, याचे संपूर्ण नियोजन केले. नियोजित कटानुसारच त्यांनी शुक्रवारी, दि. १७ दुपारी तीन वाजता प्रथमेशचा काटा काढला.
महाविद्यालयातून बाहेर पडताना प्रथमेशला चैतन्य व विजयने अडवले. त्याला आमच्यासोबत चल, असेही ते म्हणाले. मात्र, प्रथमेशने नकार देताच त्या दोघांनी त्याला चाकूचा धाक दाखविला, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. हा सर्व कट शांत डोक्याने करण्यात आला असून, अकरावी, बारावीच्या मुलांनी सराईताप्रमाणे हा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या तपासात अखेर उघड झालं.
प्रथमेशचा रात्रभर घेतला शोध..
प्रथमेश दररोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरी यायचा. मात्र, शुक्रवारी तो परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, प्रत्यक्षात त्याचदिवशी दुपारी प्रथमेशचा खून झाला होता. शुक्रवारी रात्रभर शोध घेऊनही प्रथमेश न सापडल्याने शनिवारी कुटुंबीय कॉलेजच्या गेटजवळ येऊन थांबले होते. प्रथमेश कॉलेजमध्ये तरी येईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला.
पोलिस पथकाला अधीक्षकांकडून बक्षीस
कºहाड तालुका पोलिसांनी फक्त आठ तासांत या गुन्ह्याला वाचा फोडली. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक एम. के. साबळे, पी. के. राठोड, उपनिरीक्षक ए. एस. भापकर, ए. व्ही. चौधरी, पोलिस नाईक शशी काळे, अमित पवार, सागर बर्गे, प्रवीण पवार, शशी घाडगे, आसिफ जमादार, विजय भोईटे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. या पथकाला पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडून १५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
मित्र होणार साक्षीदार
या प्रकरणाचा सुरुवातीपासूनचा घटनाक्रम तपासताना अनेकांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये काहीजण प्रथमेशचे मित्र तर काहीजण चिन्मयचे मित्र आहेत. यापैकी प्रथमेशच्या मित्रांना चिन्मय आणि प्रथमेशच्या वादाबाबत सुरुवातीपासूनची माहिती आहे. त्यामुळे त्यांना साक्षीदार करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावणारा
प्रथमेशचा मृतदेहाचे वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी मृतदेह गावी नेल्यानंतर संकपाळ कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेबाबत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होतोय.

Web Title: Cut in the hostel; Bought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.