साताऱ्यातील कपडे व्यापाऱ्यावर कॉपीराईटचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:21 PM2018-04-18T12:21:53+5:302018-04-18T12:21:53+5:30

मफतलाल कंपनीची परवानगी न घेता विद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबल लावून विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील सिटीसेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांच्यावर फसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copyright Criminal Code of Commerce on Saturn | साताऱ्यातील कपडे व्यापाऱ्यावर कॉपीराईटचा गुन्हा

साताऱ्यातील कपडे व्यापाऱ्यावर कॉपीराईटचा गुन्हा

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबलफसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल

सातारा : मफतलाल कंपनीची परवानगी न घेता विद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबल लावून विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील सिटीसेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांच्यावर फसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सदाशिव पेठेतील सिटी सेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया यांनी मफतलाल कंपनीच्या परवानगीशिवाय पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुला-मुलींच्या शर्ट व स्कर्टवर मफतलाल असे बनावट लेबल लावले.

त्या कपड्यांची विक्री करून कंपनीच्या ग्राहकांची व मफतलाल कंपनीची आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांच्या मालकीच्या दुकानात ३ लाख १० हजार ५६० रुपये किमतीचा माल मिळून आला.

याप्रकरणी कंपनीचे अधिकारी कमलेशकुमार कामात सिंग (रा. वसई) यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करीत आहेत.

Web Title: Copyright Criminal Code of Commerce on Saturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.